दिवाळीनिमित्त २० व २१ ऑक्टोबर रोजी दिपावली महोत्सवाचे आयोजन

लोहारा ( जि.उस्मानाबाद ) : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती लोहारा अंतर्गत स्वयंसहायता समुहातील महिलानी उत्पादित केलेल्या पारंपरिक खाद्य पदार्थ, मसाले,दिवाळी निमित्त फराळ वस्तू,हस्तकलेच्या वस्तू,पणत्या व इतर बरेच उत्पादने घेऊन महिला या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.
सदर महोत्सवाचे उद्घाटन लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मा.शितल खिंडे मॅडम यांच्या शुभहस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व नारळ फोडून करण्यात आले.दिनांक २० व २१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत महोत्सवामध्ये महिलांनी आणलेली उत्पादने विक्रीस उपलब्ध असून पंचायत समिती कार्यालय येथील अधिकारी,कर्मचारी व सर्व जनतेस खरेदी करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी यांनी केले आहे तसेच महोत्सवात सहभागी महिलांना दीपावली महोत्सव व दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री.नागनाथ कुंभार,कनिष्ठ प्रशासन अधिकारी,श्री प्रवीण निंबाळकर, तालुका अभियान व्यवस्थापक श्री. अलंकार बनसोडे इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक श्री अलंकार बनसोडे यांनी केले तर सूत्रसंचालन तालुका समन्वयक फॉरवर्ड लिंकेज श्री.राहुल मोहरे यांनी तर आभार प्रदर्शन सौरभ जगताप यांनी केले तसेच सदर कार्यक्रम करिता तालुका व्यवस्थापक प्रणिता कटकदौंड,माधुरी माळी,प्रीतम बनसोडे,अविनाश चव्हाण,अन्तेश्वर माळी,रामेश्वर दुरगुळे,शिवशंकर कांबळे,प्रदीप चव्हाण,किशोर हुडेकर, प्रदीप लोंढे,नंदन थोराथ,तसेच सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांनी परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!