शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका मयुरी बिराजदार यांनी केले लोटांगण आंदोलन

लोहारा ( जि. धाराशिव ) : मुलभुत सुविधा मिळाव्यात व प्रभागाला न्याय मिळावा म्हणुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांच्या वतीने मंगळवारी लोटांगण आंदोलन करण्यात आले.
लोहारा शहरासाठी शासनाने दिलेल्या निधीचे असमान वाटप करुन शहरातील काही प्रभागांना दुय्यम वागणुक देऊन मुद्दाम नागरीकांची गैरसोय करण्यात येत आहे.त्या प्रभागातील काही कामे जाणिवपुर्वक केली जात नाहीत.प्रभागातील स्वच्छता,दिवाबत्ती, पाणीपुरवठा याकडे जानीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे.हाच प्रकार प्रभाग क्र ६ च्या बाबतीतही होत आहे.यामुळे नगरपंचायत प्रशासना विरोधात प्रभाग क्र ६ मधिल नागरीक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रभाग क्र ६ च्या नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांचे न्याय मिळण्यासाठी लोटांगण आंदोलन करण्यात आले.
यावेळी लोहारा शहरातील प्रभाग क्र ६ मधिल आडलेले कामाच्या घाण पाण्याचे पुजन करुन आंदोलनाला सुरवात करण्यात आली.येथुन प्रभागातील नागरीक महिलांच्या उपस्थीत हे आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रभाग क्र ६ ते क्रांतीसुर्य महात्मा फुले चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपंचायत कार्यालय लोहारा पर्यत नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांनी सर्व प्रभागांना समान न्याय द्यावा,सर्वसामान्य गरजेची स्वच्छता,पाणीपुरवठा व दिवाबत्तीची कामे वेळेवर व्हावित म्हणुन लोटांगण घातले.
यावेळी नगरपंचायत येथे पुर्वी कल्पना देऊनही एकही अधिकारी नगरपंचायत कार्यालयात उपस्थित नव्हता.लोकप्रतिनिधीची ही अवस्था असेल तर सर्वसामान्याचे काय असेल म्हणुन महिलांनी तिर्व प्रतीक्रिया दिल्या.हे निवेदन स्विकारण्यासाठी कोणिही उपस्थित नसल्याने संतप्त नागरीक व शिवसैनिकांनी मुख्याधिकारी यांच्या खुर्चिला हार घालुन निवेदन रिकाम्या खुर्चिला दिले.
शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी जे अधिकारी लोहारा शहराची सर्वच बाबतीत यामध्ये निधिवाटपात असलतोल,पाणिपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती या मुलभुत सुविधांबाबत नागरीकांचे कुचंबना करुन फक्त अर्थकारण साध्य करत आहेत त्यांना त्यांची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दाखवण्यात येईल असे सांगीतले.
प्रभागातिल महिला संगीता स्वामी यांनी जर महिलांना आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरुन लोटांगण घालत यावे लागत असेल तर खुप लाजीरवाणी गोष्ट आहे असे म्हणाल्या तसेच अधिकारी यांना याचे पाप लवकरच फेडावे लागेल असे सांगीतले.
प्रभाग क्र ६ चे शाखाप्रमुख तसेच नागरीक असलेले रघुविर घोडके यांनी आपल्या भावणा यावेळी व्यक्त केल्या.
शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार,शिवसेना शहप्रमुख सलीम शेख,मा.नगरसेवक शाम नारायनकर, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे,शिवदूत महेबुब गवंडी,सोशल मीडिया प्रमुख प्रेम लांडगे,युवा सेना शहर प्रमुख दिनेश गरड,शाखा प्रमुख महेश बिराजदार,अंकुश परिट,गोविंद बंगले,अक्षय सगट,महेश चपळे,विलास जेवलिकर यासह प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिक संगीता स्वामी,नीलावती भोकरे,मंगल स्वामी ,बानुभाभी फुटानकर,उज्वला बिराजदार,मंगल निर्मळे,निर्मला निर्मळे,भामाबाई बंगले,सुजाता पाटील,लक्ष्मी घोडके, मनीशा पोतदार, राजू स्वामी,रघुवीर घोडके,राजू मन्मथ स्वामी,बलभीम पाटील,बलभीम स्वामी,अप्पू स्वामी, विशाल स्वामी, असिफ चाऊस,अक्षय पाटील,बाबा सुंबेकर,चंद्रकांत बिराजदार,बबन रणशुर,अभिजित स्वामी,रतन जाधव, दयानंद स्वामी,नेताजी भोकरे, बिजू चाऊस,बलभीम स्वामी,किरण पाटील,आकाश विरोधे, प्रदीप घोडके, सुजित पोतदार,बलभीम पाटील,दत्ता स्वामी,अंकुश परिट,गुरुपत स्वामी,बसवंत बंगले,सुनील ठेले,दगडु निर्मळे,आकाश निर्मळे,कपिल स्वामी,शरणू स्वामी,हांनु फुटानकर यासह अनेक लोहारा शहरातील नागरीक शिवसेना,युवासेना,महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.