दिघी येथील स्नेहछाया परिवारातील लेकरासोबत दिवाळी साजरी

उस्मानाबाद : दि.२४ ऑक्टोबर २०२२ रोजी उद्योजक व गया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय राठोडे यांनी उद्योजक मित्र परिवारासह पिंपरी चिंचवड, दिघी येथील स्नेहछाया परिवारातील वंचित, निराधार, दुर्लक्षित, स्थलांतरित, आत्महत्याग्रस्त शेतकरी, ऊसतोड मजुर यांच्या लेकरांना दिवाळी फराळ आणि किराणा देऊन त्यांना आपुलकीचे व प्रेमाचे चार घास भरवून त्यांचा आनंद द्विगुणित करून सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी साजरी केली.
यावेळी त्यांनी येथील बालगोपाळांशी संवाद साधला व त्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. प्राणायाम व योगाचे महत्त्व पटवून देत स्वतः काही योगासने व प्राणायाम करून दाखवले. त्यांनी दिवाळीच्या निमित्ताने येथील बालगोपाळांसाठी नवचेतना व बालचेतना या शिबिराचे लवकरच आयोजन केले जाईल. असे सांगितले. यावेळी उद्योजक श्री.मोहरसिंग वर्मा, सौ.उर्मिला वर्मा, दिपक वर्मा,उद्योजक शंकर तांबे सौ.सारिका इंगळे व श्री. सुनील काकडे उपस्थित होते.स्नेहछाया चे संचालक प्रा.दत्तात्रय इंगळे यांनी सदर उपक्रमाचे अभिनंदन करत श्री दत्तात्रय राठोडे व उपस्थित सर्वांचे आभार मानले व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.