लोहारा / उमरगा : समाजातील जबाबदार लोकांनी निश्चयपूर्वक बालविवाहा सारख्या वाईट रूढी परंपरेला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केल्यास बालविवाह मुक्त समाज निर्माण व्हायला उशीर लागणार नाही असे मत राज्य बाल हक्क आयोगाचे सदस्य विधिज्ञ् संजय सेनगर यांनी व्यक्त केले.
ते हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेने 10 ऑक्टोबर रोजी लोहारा येथे आयोजित केलेल्या बालविवाह प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या शासकीय पदाधिकारी यांच्या कार्यशाळेत बोलत होते यावेळी व्यासपीठावर बाल कल्याण समिती धाराशिव चे अध्यक्ष विजयकुमार माने, जि. म. बा. च्या बाल संरक्षण कक्षाच्या प्रज्ञा बनसोडे जिल्हा चाईल्ड लाईन च्या समन्व्यक पल्लवी पाटील, बाल कल्याण समिती सदस्य दयानंद काळुंके हे उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक मनोगतात प्रकल्प समन्वयक बसवराज नरे यांनी बालविवाह रोखण्यासाठी संस्थेने हाती घेतलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली..
पुढे बोलताना श्री्युत सेनगर सर सर्व प्रशिक्षणार्थी मध्ये फिरत त्यांचा सहभाग वाढवत लहान, लहान, व्हिडीओ, PPT याचा आधार घेत प्रशिक्षण घेतले व बालविवाह प्रतिबंध कायद्या संबधी कायद्याची सविस्तर माहिती देत गाव पातळीवरील बाल संरक्षण समितीच्या सर्व सदस्यांची जबाबदारी याविषयीं चर्चा घडवून आणली.
या प्रशिक्षणास लोहारा तालुक्यातील 15 गावातील गाव पातळीवरील ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य त्यात ग्राम सेवक, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, शिक्षक, ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधी, सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रशिक्षणास उपस्थित असलेल्या माळेगाव येथील 8 वीत शिकणाऱ्या लक्ष गटातील मुलगी वैष्णवी गर्जे ही बालविवाह रोखण्यासाठी 1098 या टोल फ्री नंबर विषयी सविस्तर माहिती दिल्याबद्दल प्रज्ञा बनसोडे व पल्लवी पाटील यांनी तिचे कोतुक करून सत्कार केला.
कार्यमाचे सूत्रसंचालन सहा. समन्वयक सतिष कदम यांनी केले तर आभार नागिणी सुरवसे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीते साठी हॅलो चे कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाधव, स्वाती पाटील, सोपान सुरवसे, प्रणिता भोसले, वासंती मुळे, श्रीराम जाधव इंदुबाई कबाडे, नूतन गायकवाड आदिनी परिश्रम घेतले.