सय्यद बाशा यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी यादव तर उपाध्यक्षपदी ओवांडे यांची निवड

लोहारा : हिंदू-मुस्लिम धर्माचे श्रद्धास्थान असलेले सय्यद बाशा देवस्थान तीनशे वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या लोहारा तालुक्यातील सय्यद हिप्परगा गावात हिंदू मुस्लिम धर्माच्या एकीचे प्रतीक असलेले सय्यद बाशा हे जागृत देवस्थान आहे हे देवस्थान मुस्लिम धर्मीयांचे असले तरी येते हिंदू धर्माच्या पवित्र अशा गुढीपाडवा या सणाच्या दिवशी यात्रा भरण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. हिप्परगा सय्यद गावातील सय्यद बाशा कमिटी अध्यक्षपदी गुरुनाथ यादव, उपाध्यक्षपदी ब्राह्मनद ओवांडे यांच्या बिनविरोध निवड करण्यात आली.
असून गावचे तंटामुक्त अध्यक्ष आदिनाथ भोजराव, सरपंच श्रिशैल ओवांडे, चेअरमन नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 17 मार्च रोजी हनुमान मंदीरात बैठक घेण्यात आली व यावेळी नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणेकमिटी सदस्य पांडुरंग कोळी, महादेव कोटमाळ, नवनाथ भारती, मनोहर बिराजदार ,वैजनाथ गवारे, संदीप पाटील, बाळासाहेब यादव , नबीलाल कारभारी, गुंडाप्पा ओंवाडे, झाकीर कारभारी ,बळी भोजराव, आधीची कार्यकारणी जाहीर करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा.