सोहळा मराठवाड्यातील कर्तुत्वाच्या सन्मानाचा….

पुणे : मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव दिनानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे आयोजित मराठवाडा भुषण पुरस्कार वितरण तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीमध्ये योगदान दिलेल्या कुटुंबांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये आपल्या लोहारा तालुक्यातील मार्डी या गावातील शिवाजीअप्पा कदम यांच्या मातोश्री प्रयाग (आजी) भीमराव कदम यांचा विशेष सन्मान करण्यात आला याचा विशेष आनंद आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल १३ महिन्यानंतर मराठवाड्याचे म्हणजे तेव्हाचे हैदराबाद संस्थानचे भारतामध्ये विलीनीकरण झाले. म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी मराठवाडा वासीय स्वतंत्र नव्हते तर ते एका निजाम राजवटीच्या संस्थांच्या अधिपत्याखाली होते, त्या भागातील लोकांना भारतामध्ये सामील (विलीन) होण्यासाठी तब्बल स्वातंत्र्यानंतर ही १३ महिने वेगळा लढा द्यावा लागला आणि त्या लढ्यामध्ये कित्येक कुटुंबांनी कशाचीही पर्वा न करता निजाम राजवटी विरुद्ध कठोर असा लढा दिला त्यातीलच शिवाजीआप्पा कदम यांचे वडील म्हणजेच प्रयाग (आजी) कदम यांचे पती भीमराव कदम यांना निजामाविरुद्ध लढा देत असताना नऊ वर्षाचा कठोर तुरुंगवास झालेला होता, त्यात ४० दिवस गुलबर्गा येथील तुरुंगात आणि बाकीचे राहिलेले वर्ष आणि दिवस वरंगल जेल (कारागृह) म्हणजेच आत्ताचे जसे येरवडा जेल (कारागृह) आहे तसे निजामाचे तेंव्हा वरंगल जेल म्हणून आत्ताच्या आंध्रप्रदेश येथे होते, ज्यावेळी शिवाजीआप्पा कदम यांचे वडील जेलमध्ये होते त्यावेळेस त्यांच्या आईने म्हणजे प्रयाग (आजी) यांनी कुटुंबाचा भार अगदी जबाबदारीने सांभाळला होता, “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते” याचे उत्तम उदाहरण प्रयाग (आजी) यांच्या रूपाने पाहायला मिळाले, अशा निस्वार्थ भावनेने मराठवाडा मुक्ती संग्रामच्या लढ्यामध्ये आपले योगदान देऊन देश सेवा केलेल्या कुटुंबांचा सन्मान पुण्यासारख्या ठिकाणी झाला याबद्दल आपल्यासाठी ही गोष्ट अभिमानाची आणि पुढील पिढीला प्रेरणा देण्यासारखीच आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होण्याच्या कार्यामध्ये वेगवेगळ्या रुपात योगदान देत मातीसाठी लढणाऱ्या या लढवय्या व्यक्तीमत्वांना मनःपूर्वक नमन…
😊तुमचाच,😊
ॲड.आविनाश चिकटे
“जिल्हा व सत्र न्यायालय पुणे”
Whatsapp-9923237287
Call- 8530760999