लोहारा /उमरगा : लोहारा शहरातील दैनिक सकाळचे पत्रकार नीलकंठ कांबळे यांना बहुजन रयत परिषदेचा ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनमित्त बहुजन रयत परिषदेच्या वतीने उमरगा-लोहारा तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देञ गौरवण्यात येते. यंदाचा पत्रकार क्षेत्रातील आदर्श पत्रकार पुरस्कार लोहारा शहरातील पत्रकार नीलकंठ कांबळे यांना जाहीर झाला. या पुरस्काराचे वितरण रविवारी (दि. २९) उमरगा येथील श्रीराम मंगल कार्यालयात संपन्न झाला. बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा कोमल साळुंके, कृषी बाजार समितचे माजी सभापती जितेंद्र शंदेे, शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी समाज-कल्याण सभापती हरिष डावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, कार्यक्रमाचे आयोजक बालाजी गायकवाड यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नीलकंठ कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पत्रकार बालाजी बराजदार, नितीन वाघमारे, भागवत गायकवाड, सुखदेव होळीकर, ईश्वर क्षीरसागर, दीपक रडगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.