धाराशिव : सन २०२३-२४ चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार राज्य शासनाने जाहीर केला आहे.

सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्रवर्गनिहाय १०९+१० शिक्षकांची निवड केली आहे.

यात धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षका सुनंदा निर्मळे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. याबद्दल बेलवाडी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर सुर्यवंशी, शिक्षक अनंत कानेगावकर,बबिता शिंदे, मलिकार्जुन कलशेट्टी आदींनी अभिनंदन केले आहे.
Back to top button
error: Content is protected !!