जेवळी, (ता.लोहारा, जि.धाराशिव ) : जेवळी (ता. लोहारा) येथील श्री मोरया गणेश मंडळ व स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरत ६१ रक्तदात्याने रक्तदान केले. येथील श्री मोरया गणेश मंडळाच्या वतीने उत्सव काळात विविध शालेय स्पर्धा, वृक्षारोपण, गरीब कुटुंबांना किराणा किट वाटपाबरोबरच डॉल्बी विरहित मिरवणूकचा उपक्रम राबवित आहे
जेवळी येथील श्री मोरया गणेश मंडळ व स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांच्या सयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता.१२) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन येथील श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठाचे मठाधीश म.नि.प्र. गंगाधर महस्वामिजी यांच्या हस्ते पार पडले.
HTML img Tag
यावेळी युवती सेनेचे मराठवाडा निरीक्षक ॲड आकांक्षा चौगुले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (मुंबई) पोलीस निरीक्षक राहुल कारभारी, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बसवराज कारभारी, सरपंच महानंदा पणुरे, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रयोग शाळा तंत्रज्ञ पवन राठोड, औषध निर्माता उज्वल कारभारी, श्रीकृष्ण रक्तपेढीचे डॉक्टर सागर पतंगे, विजय केवडकर, अभियंता आशिष पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. या रक्तदान शिबिरात युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. उमरगा येथील श्रीकृष्ण रक्तपेढीने हे रक्त संकलन केले आहे. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विशाल कारभारी, उपाध्यक्ष बसवराज वर्दे, सचिव स्वप्निल कारभारी, खजिनदार गुणवंत भैरप्पा, महेश सुरवशे, अरुण आवळे, रोहित कारभारी, सिद्राम मुळे, विजय कडगंची श्रीकांत वेलदोडे, शिवराज स्वामी, सौरभ कोराळे, आप्पू कारभारी, विश्वा सारणे आदींनी परिश्रम घेतले.

या बरोबरच या उपक्रमशील गणेश मंडळाने उत्सव काळात काळात वृक्षारोपण, गरीब कुटुंबांना किराणा किट वाटप, भजन, शालेय विद्यार्थ्यासाठी चित्रकला, निबंध, हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रोहित कारभारी, संस्थापक अध्यक्ष श्री मोरया गणेश मंडळ.
प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमाबरोबरच डॉल्बी विरहित मिरवणूकीच्या संकल्प केला असून श्री च्या मिरवणुकीत ढोल ताशासह ऐतिहासिक देखावे सामील करण्यात येणार आहे.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!