भारत जोडो यात्रेच्या सन्मानार्थ जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने उमरग्यात मोटारसायकल रॅली

उमरगा (उस्मानाबाद ) : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमरगा शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेला पुष्पहार घालून भारत जोडो यात्रेच्या सन्मानार्थ जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने उमरग्यात प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी, तालुकाध्यक्ष योगेश राठोड, जिल्हा सरचिटणीस गौस शेख, सचिन पाटील, विजय वाघमारे, राहुल हेबळे, पप्पू सगर, महेश माशाळकर, भरत मारेकर, विक्रम मस्के, वसीम शेख, राहुल सरपे, ब्रम्हानंद पाटील, राजू मुल्ला, राहुल वाघ, याकुब लदाप, यशपाल कांबळे, श्रीहरी पाटील, रोहित कारभारी, विक्रम दासमे, महादेव कारभारी, सोहेल इनामदार आदीसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!