लोहारा/उमरगा(जि.धाराशिव ) : महाराष्ट्रातील महिलांवरील वाढते अत्याचार पाहता शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणे आज काळाची गरज आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी शक्ती कायदा अमलात आणण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पाडली होती. पण काही कारणास्तव सत्तांतर झाले व शक्ति कायद्याची अंमलबजावणी रखडली गेली.
HTML img Tag
शिवसेनाप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून शक्ती कायदाची अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. स्वाक्षरी केलेल्या याद्या देशाच्या राष्ट्रपती माननीय द्रोपदी मुर्मु यांच्याकडे पाठवण्यात येणार आहेत. याचाच भाग म्हणून नवनियुक्त धाराशिव जिल्ह्याच्या युवती विस्तारक स्वातीताई बोरकर यांच्या माध्यमातून संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. लोहारा शहरातील कै.शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय व नेताजी सुभाष चंद्रबोस महाविद्यालय मध्ये आज या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते.

यावेळी धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख शंकर बोरकर,युवतीसेना जिल्हा विस्तारक स्वातीताई बोरकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे,माजी नगराध्यक्ष पौर्णिमाताई लांडगे,सुवर्णमाला नारायणकर,यांनी महाविद्यालयीन तरुणींना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन शिंदे यांनी केले.

यावेळी धाराशिव जिल्ह्याचे सहसंपर्कमुख शंकर तात्या बोरकर धाराशिव जिल्हा युवतीसेना विस्तारक स्वातीताई बोरकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल ताई वडणे, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगराध्यक्ष पौर्णिमा लांडगे, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, माजी नगरसेवक शाम नारायणकर, नगरसेवक मयुरी बिराजदार, शिवधूत मेहबूब गवंडी, विकास सिसो माजी सदस्य रघुवीर घोडके,तुकाराम वाळके, नितीन जाधव यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!