कै. भिमराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लोहारा : लोहारा तालुक्यातील होळी येथील कै. भिमराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परीषदेचे सभापती बाबुराव राठोड हे होते. तर प्रमुख पाहुणे डॉ.संजय राठोड,डाॅ.वर्षाताई राठोड,सुमनताई राठोड, सुनिताताई राठोड,प्रकाश पवार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बी.टी. कांबळे , रविकांत चव्हाण, बालाजी राठोड उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेतला होता त्याचे बक्षिस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ.संजय राठोड, शाळेचे प्राचार्य डोबाळे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी.के. चव्हाण यांनी केले तर आभार प्रा. एस.बी.चव्हाण यांनी मानले.यावेळी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!