अझीम प्रेमजी विश्व विद्यालयात कार्यक्रम सादर

धाराशिव : महान, नवोदय प्रवर्तक व संकल्पना जनक व्यक्तिमत्व स्व.राजीव गांधी यांना पी.एम. श्री ज. न. वि. धाराशिवच्या सामजिक विज्ञान विभागाचा जयंती निम्मित कृतज्ञ भावनेने बेंगलोर येथील अझीम प्रेमजी विश्व विद्यालयात कार्यक्रम सादर केला.

राजीव गांधी यांच्यामुळे नवोदय विद्यालयाची बीजे रोवून ग्रामीण भागातील कलागुणांना संधी निर्माण झाली व जवळपास १००० पेक्षा जास्त आय ए एस, आय पी एस,५००० पेक्षा जास्त डॉक्टर, इंजिनिअर आणि कितीतरी प्राध्यापक, शिक्षक,न्यायाधीश उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, शिक्षणाधिकारी सारखे अनेक उच्चपदस्थ निर्माण करण्याचे व भारतास एक सक्षम मनुष्यबळ देण्याचे स्वप्न आज त्यांच्यामुळे भारतात साकार होत आहे. म् संपूर्ण जंबुद्वीप/भारतातील एकुण ७४८ जिल्ह्यांपैकी ६६१ जिल्ह्यांमध्ये आज नवोदय विद्यालय खूप यशस्वी पद्धतीने , भारत सरकारच्या, केंद्रीय शिक्षण मंत्रालया मार्फत चालत आहेत.

कै. राजीव गांधी यांच्या 80 व्या जयंती निमित्त, या नवोदय जनकाचे अत्यंत कृतज्ञतेने आणि अंतःकरणापासून स्मरण.त्यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त बेंगलोर येथील अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी मध्ये पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय तुळजापुर जिला धाराशिवच्या सामजिक विज्ञान विभागाचे श्री चक्रपाणि गोमारे, श्री दिलीप खिल्लारे ,श्री.भगवान वंजारे यांनी जयंती कार्यक्रम घेवून वेगळ्या पद्धतीने साजरा केला. यात अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी चे अनेक फॅकल्टी व समन्वयक उपस्थित होते.
भारत पाकिस्तान आणि स्मृती दिवसा निमित्त नवोदय विद्यालय तुळजापूर येथे सामाजिक विज्ञान विभागाद्वारे एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या प्रदर्शनात फाळणीच्या आठवणी चित्र बॅनर द्वारे व्हिडिओ पीपीटी द्वारे सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले समाज प्रबोधनासाठी तुळजापूर येथील मान्यवर मंडळी इतिहास संशोधक व इंग्रजी शाळेची विद्यार्थी या प्रदर्शनासाठी उपस्थित होते प्राचार्य इंगळे सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमासाठी डॉक्टर सतीश कदम डॉक्टर कार्तिक पोळ हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!