लोहारा / उमरगा : मौजे.हिप्परगा रवा ता.लोहारा येथील विविध विकास कामांचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.
यामध्ये 2515 योजनेअंतर्गत सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका उभारणे 20 लक्ष या कामाचे लोकार्पण व 25 15 योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता करणे 20 लक्ष, 2515 योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता करणे 10 लक्ष, आमदार स्थानिक विकास निधीतून विंधन विहीर घेणे, 2225 योजनेतून दलित स्मशानभूमी विकसित करणे 10 लक्ष, तीर्थक्षेत्र विकास योजनेतून नृसिंह मंदिर परिसर विकसित करणे 10 लक्ष, आ.स्था.विकास निधीतून हिप्परगा रवा ते उंडरगाव रस्त्यावर नळकांडी पूल बांधणे 2 कोटी, 95/5 योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता करणे 10 लक्ष या कामांचे लोकार्पण तसेच लोहारां ते हिप्परगा रवा प्रजीमा 41 या रस्त्याची सुधारणा करणे 4 कोटी रुपये या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
मंजूर केलेल्या विकासकामांबाबत नागरिकांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे आभार व्यक्त करत सत्कार केला.
यावेळी लोहारां तालुकाप्रमुख जगन पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, अभिमान खराडे, अविनाश माळी, प्रमोद बंगले के.डी. पाटील, आयुब शेख, श्रीकांत भरारे, विजयकुमार ढगे, माजी पं.स.सदस्य इंद्रजीत लोमटे, सरपंच अभिमान कांबळे, उपसरपंच विजय लोमटे, राजेंद्र माळी, विनोद मुसांडे, अनिल ओवांडकर, नारायण माळी, युवराज जाधव, धर्मवीर जाधव, नारायण क्षीरसागर, तानाजी नरगाळे आदी जण उपस्थित होते.