लोहारा- (जि.धाराशिव ) प्रतिनिधी
आगामी उमरगा लोहारा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने इच्छुक प्रा.अँड.पांडुरंग पोळे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
लोहारा तालुक्यातील आष्टा (कासार) येथील रहिवासी असलेले प्रा.अँड.पांडुरंग पोळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे विधानसभा उमेदवारी साठी मागणी केली आहे.
गेल्या २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवलेली आह. त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी विधानसभेसाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे मागणी केली आहे.
पेशाने प्राध्यापक असले तरी शिक्षणाने, इंजिनिअर, वकील, पत्रकार, एमफील आहेत. शिवाय त्यांना महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. इंजिनिअर, वकील, पत्रकार, लेखख, उद्योजक असलेले प्रा.अँड.पांडुरंग पोळे हे लोहारा तालुक्यातील रहिवासी असल्याने त्यांच्या कडून लोहारा तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल अशी अपेक्षा मतदारांतून व्यक्त होत आहे. त्यांनी या अगोदर दोन वेळा पुर्ण क्षमतेने उमरगा-लोहारा विधानसभा निवडणुक लढविली असल्याने त्यांची नाळ मतदारांशी जुळली आहे. शिवाय शिक्षण व पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या समाज कार्याच्या जोरावर प्रा.अँड.पांडुरंग पोळे यांनी शिवसेना (उबाठा) चा झेंडा गद्दारा विरोधात उगारला आहे.
याबाबत लोहारा येथें पत्रकार परिषद घेत त्यांनी उमरगा – लोहारा मतदार संघ मागासलेला आहे त्याचा विकास करणार यासाठी आपली भूमिका मांडली.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!