राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी येथे ४, ५ नोव्हेंबरला अभ्यास शिबीर

शिर्डी : वेध भविष्याचा मधून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी सज्ज राहण्याच्या उद्देशाने अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, खा.प्रफुल्ल पटेल, खा.सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार,माजी उपमुख्यमंञी छगन भुजबळ यांच्यासह आदी उपस्थित राहणार आहेत. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रासह, रूपयाचे अवमूल्यन, धर्मांधता, महागाईची परिस्थिती आदीवर अवलोकन करून येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत कसे काम करायचे, यावर मंथन होणार आहे.