25 गटाला 32 लाख रुपये कर्ज वाटपास मंजूरी तर 6 गटाला 11 लाख रुपये वाटप

लोहारा : उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष लोहारा व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माकणी व शाखा जेवळी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने धानुरी, माकणी, वडगाव गांजा,विलासपुर पांढरी येथील महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यासाठी कर्ज प्रस्तावावर सह्या घेण्यात आल्या.यावेळी 25 गटाला 32 लाख रुपये वाटप करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा जेवळी ने मंजुरी दिली. व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माकणी ने 6 गटाला 11 लाख रुपये वाटप करण्यात आले.तसेच सामाजिक सुरक्षा विमा योजना याविषयी सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माकणी चे बँक मॅनेजर कुंदन पाटील सर यांनी बँक कर्ज प्रस्ताव तपासणी करून प्रत्यक्ष गटातील सदस्य महिला त्याच असल्याची खात्री केली.महिलांना व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक सहकार्य वेळोवेळी करत असून त्याचा लाभ गटातील महिलांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.प्रभाग समन्वयक अंतेश्वर माळी सर यांनी गटातील महिलांना कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले तसेच कर्ज परतफेड व व्यवसाय वाढीसाठी महिलांना मार्गदर्शन केले. शासकीय योजनांची माहिती सांगितली महिलांना व्यवसाय करण्याचे आवाहन केले.

HTML img Tag Simply Easy Learning

या मेळाव्याचे आयोजन तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद अभियानाचे केडर बँक सखी लैला मुरमे, सीआरपी वैशाली नरसिंह साळुंखे, बँक सखी नसरिन वल्लीपाशा सय्यद व माधुरी मुळे,किशोर हुडेकर यांनी प्रयत्न केले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!