लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच भाग्यश्री पाटील, ग्रा.प सदस्य मनोज देशपांडे, परमेश्वर भालेराव, नितीन देशपांडे, ग्रामसेवक भोरे एन. बी. ,ग्रा.पं. शिपाई बबन बाबर, कमलाकर देशपांडे, संगणक परिचालक अमोल कांबळे, महादेव गोरे, तानाजी जाधव, आण्णाराव देशपांडे, गोविंद यादव, जीवन पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.