
लोहारा ( जि. धाराशिव ) : लोहारा शहरातील गेले २४ वर्षे झाले महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ०८ मार्च ते ११ मार्च या कालावधीत चार दिवस यात्रा महोत्सव चालणार आहे.
शुक्रवार दि. ०८ मार्च २०२४ रोजी सकाळी ९ वाजता लोहारा शहरातून भव्य शोभायात्रा ,त्यानंतर सकाळी ११ वाजता महादेवाची महाआरती ,
छत्रपती शिवाजी चौकात भारुडाचा कार्यक्रम दुपारी १२ वाजता,याप्रसंगी शिव भक्तांसाठी चालक मालक संघटनेच्या वतीने फराळाची व्यवस्था ,
सायंकाळी ६.०० वाजा दिपोत्सव ( फक्त महिलांसाठी)

दि.०९ मार्च २०२४ सकाळी ८ वाजता शिवस्तोत्र पठण स्पर्धा
(रावण रचित) प्रथम – २५०० रुपये, द्वितीय १५०० रुपये, तृतीय – ११०० रुपये, ही सर्व बक्षिसे श्री बालाजी मक्तेदार यांच्या तर्फे देण्यात येणार आहेत.
सकाळी ११:३० वाजता काल्याचे किर्तन शिवभक्त संगमेश्वर बिराजदार महाराज वलांडीकर सेवा कै. विश्वनाथ मुरलिंगप्पा जट्चे यांच्या स्मरणार्थ श्री वैजिनाय गट्टे यांच्या तर्फे,
महाप्रसाद दुपारी १ वाजता श्री बापू मुळे व श्री नितीन लोहार यांच्या तर्फे,

दुपारी ४ वाजता जंगी कुस्ती स्पर्धा
विजेता – ३५ तोळे चांदीची महादेवाची पिंड कै. चनवसप्पा महोळप्पा जट्टे यांच्या स्मरणार्थ श्री शिवशंकर चनबसप्पा जट्टे परिवारा तर्फे
उप विजेता- ५०००/- रु. व स्मृती चिन्ह कै. सुग्रीव गुणाप्पा रसाळ यांच्या स्मरणार्थ श्री नरहरी सुग्रीव रसाळ परिवारा तर्फे
रविवार दि.१० मार्च २०२४
सकाळी ७ वाजता
मॅरेथॉन स्पर्धा ३००० मी. (मुले) ,
सकाळी १० वाजता महादेव मंदिर येथे खुल्या रांगोळी स्पर्धा ( फक्त महिलांसाठी), प्रथम २१०१ रुपये, द्वित्तीय १५०१ रुपये, तृत्तीय १००१रुपये होळकुंदे ट्रेडर्स, लोहारा यांच्या तर्फे
हायस्कूल लोहारा मैदानावर सायंकाळी ७ वाजता भव्य जंगी भारुडाचा कार्यक्रम

सोमवार दि. ११ मार्च २०२४
सायंकाळी ७ वाजता भव्य खुल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा होणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!