ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त “बालिका दिन ” आणि आजी – आजोबा दिवस उत्साहात साजरा

लोहारा (जि.धाराशिव ) : लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ” बालिका दिन” तसेच आजी -आजोबा दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण प्रा.विद्यामंदिर गुंजोटीच्या निवृत्त मुख्याध्यापिका सुरेखा भोसले, प्रमुख अतिथी म्हणून लोहारा न.पं.च्या नगरसेविका शामल माळी,  संचालिका अनुसया जाधव, पालक प्रतिनिधी मदन कुलकर्णी ,  लक्ष्मीबाई कळसकर, शोभाताई झिंगाडे, वंदना भगत, स्कुलचे मुख्याध्यापक शहाजी जाधव, यशवंत चंदनशिवे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस  मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप – प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी स्कूलमध्ये  सावित्रीबाईंची वेशभुषा करुन आलेल्या लहान मुली सर्वांचे मने आकर्षण करुन घेत होती. विद्यार्थ्यानी ज्ञानज्योती सावित्रीबाईं  फुले यांच्या जीवनावर आणि आपल्या आजी आजोबा यांच्याविषयी भाषण, गीत, चारोळ्या व मनोगतातून आणि नृत्यातून सर्वांसमोर मांडले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात भोसले यांनी सावित्रीबाई यांच्याविषयी विचार मांडताना म्हणाल्या की, सावित्रीबाई या आपल्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका असून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला त्यामूळे  3जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा करतात.

यावेळी आजी आजोबा यांच्याविषयी सादर केलेली  ” कुटुंब ” नावाची  नाटिका  पाहिल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले. आपल्या आजी आजोबा सोबत फोटो घ्यायला विशेष सेल्फी पॉइंट सर्वांचे आकर्षण ठरले.यानंतर माता पालकांसाठी रांगोळी व डिश- डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. यामध्ये माता पालकांनी अतिशय सुंदर आणि रेखीव व  सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढलेल्या होत्या तसेच विविध प्रकारचे आरोग्यासाठी सकस आहार असलेले खाद्य पदार्थ  ड्राय फ्रुट चिक्की, दुधखीर, गाजराचा हलवा, पाणीपुरी, फ्रुट सलाड, म्हैसूर पाक, निलंगा राईस,दही -धपाटे, बाजरीची भाकरी –  वांग्याचे भरीत बनवून त्याला आकर्षकपणे सजावट करून आणले होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सिध्देश्वर सुरवसे यांनी मानले.

याप्रसंगी स्कूलमधील शिक्षक प्रेमदास राठोड, व्यंकटेश पोतदार, सोनाली माळी, पूजा चौरे, अक्षता लांडगे, माधवी होगाडे, ईश्वरी जमादार, मीरा माने, सरिता पवार, अर्चना सोनके, चांदबी चाऊस, शीतल बिराजदार यांच्यासह माता पालक आणि विद्यार्थ्यांचे आजी आजोबा खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!