लोहारा ( जि.धाराशिव ) : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज 1 मे रोजी लोहारा हायस्कुल प्रशालेतील शिक्षक श्री सतीश जट्टे यांनी त्यांचे वडील कै.तमन्नप्पा महादेवआप्पा जट्टे यांच्या स्मरणार्थ प्रशालेची गरज ओळखून 51 हजार रुपये किमतीचे संगणक ,प्रिंटर संच व त्यासाठीचे आवश्यक फर्निचर शाळेस भेट दिले .शाळा तंत्रज्ञानाच्या प्रवाहात असावी तरच मुले तंत्रस्नेही होतील हा उद्देश त्यांनी ठेवला. माजी सरपंच श्री शंकर आण्णा जट्टे यांच्या शुभहस्ते संगणक संच शाळेस भेट देण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक श्री डी.एम. पोतदार,श्री वैजनाथ होळकुंदे, श्री आर. के.पोतदार ,श्याम पोतदार , पत्रकार निळकंठ कांबळे, श्रीनिवास माळी, हरी लोखंडे , आयुब शेख, माणिक तिगाडे व सौ.नंदा राठोड यांच्यासह प्रशालेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!