जेवळी ग्रामपंचायतवर श्री बसवेश्वर ग्राम विकास पॅनलचे वर्चस्व : सरपंचपदी सौ. महानंदा पणुरे विजयी

जेवळी ( जि.उस्मानाबाद ) : लोहारा तालुक्याचे लक्ष लागलेल्या जेवळी ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबाची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पणुरे व मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बसवराज कारभारी यांच्या नेतृत्वाखाली श्री बसवेश्वर ग्राम विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सौ. महानंदा पणुरे विजयी झाले आहेत. शिवाय सदस्यांच्या १७ पैकी १४ जागा ताब्यात घेत ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यावेळी विरोधकांना केवळ तीन जागेवर समाधान मानावे लागले.
यावेळीही येथे प्रति वर्षाप्रमाणे पक्ष विरहित आघाड्या निर्माण झाल्या होत्या. यावेळी येथे सरपंच पदासाठी पंचरंगी तर सदस्यासाठी तिरंगी लढत बघायला मिळाले. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान सरपंच मोहन पणुरे व मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बसवराज कारभारी यांच्या नेतृत्वाखाली श्री बसवेश्वर ग्राम विकास पॅनलने घवघवीत यश संपादन केला. यावेळी या पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सौ महानंदा मोहन पणुरे या एक हजार १६८ मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत पाच वर्षांत झालेल्या विकास कामाचा प्रभावी प्रचार, सदस्य पदाचे योग्य उमेदवार तसेच मत विभागणीचा काही प्रमाणात फायद्याबरोबरच नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबविल्याने या पॅनलला विजय मिळाला आहे. येथे सतरा सदस्यापैकी बसवेश्वर ग्राम विकास पॅनलचे यापूर्वीच तीन उमेदवार निवडून आले आहेत या वेळी उर्वरित चौदा सदस्यासाठी झालेल्या निवडणुकीत श्री बसवेश्वर ग्राम विकास पॅनलला अकरा जागा प्राप्त झाले असून शिवकृपा ग्राम विकास पॅनलला तीन जागा प्राप्त झाले आहेत. यावेळी प्रभाग पाच मधील उमेदवार बसवराज कारभारी यांना प्रभागात झालेल्या एकूण ६४७ मता पैकी ५९८ एवढे घवघवीत मत प्राप्त झाले आहेत. तसेच सरपंच पदासाठीचे उमेदवार विद्यमान जिल्हा परिषद सदस्या शोभा तोरकडे व माजी सरपंच अनिता डिग्गे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
यावेळी निवडून आलेल्या सदस्यांची नावे असे- यापूर्वीच बिनविरोध निवड झालेले श्री बसवेश्वर ग्राम विकास पॅनलचे सदस्य सौ चांदणी ढोबळे, सौ सुनिता स्वामी व सौ सुहाना मुल्ला तर आता मतमोजणी नंतर निवडून आलेले सदस्य- श्री बसवेश्वर ग्राम विकास पॅनलचे- बसवराज कारभारी, नागनाथ पणुरे, गुंडाप्पा कारभारी, शोभाबाई हावळे, विजया गाडेकर, सुभाष बिराजदार, सविता दंडगुले, बलभीम माटे, गोविंद जेवळीकर, सविता माळी, विमल राजपूत तर शिवकृपा ग्राम विकास पॅनलचे संदीप राठोड, शांताबाई जाधव, विश्वनाथ राठोड असे आहेत या विजयानंतर श्री बसवेश्वर पॅनल कडून गावात मिरवणूक काढून, फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.