महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी – माजी राज्यमंत्री बसवराज पाटील

लोहारा (जि.धाराशिव) : भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं – रासप व मित्रपक्षांच्या महायुतीच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ लोहारा तालुक्यातील जेवळी, माकणी व सास्तूर येथे शनिवारी महायुतीच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

HTML img Tag Simply Easy Learning

  या प्रसंगी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, विधानसभा प्रमुख राहुल पाटील सास्तुरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे,अभय चालुक्य, दिलीप भालेराव,किशोर साठे यांच्यासह आदीची प्रमुख उपस्थिती होती. ही लोकसभा निवडणूक इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असून देशाची पुढील अनेक दशकांची दिशा आणि दशा ठरवणारी ही निवडणूक आहे. विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येणं गरजेचं असून त्यासाठी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी यावेळी मतदारांना केले.

यावेळी शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील,लोहारा बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, राष्ट्रवादी कॉग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके,भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे यांच्यासह महायुतीतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!