धाराशिवमहाराष्ट्र
गुरुपौर्णिमेनिमित्त जेवळी मठात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; महास्वामीजींच्या सानिध्यात होणार भक्तीमय उत्सव

जेवळी, ( ता. लोहारा ) :
जेवळी (ता. लोहारा) येथील श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवारी (ता. १०) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या भक्तिभावपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या सानिध्यात होणार असून पंचक्रोशीतील भाविकांसाठी हा एक अध्यात्मिक पर्वणीचा दिवस ठरणार आहे.
वीरशैव लिंगायत संप्रदायाच्या परंपरेत मठसंस्थेला अत्यंत महत्त्व असून, जेवळी येथील श्री गुरु सिद्धेश्वर मठ हे त्याचे प्रमुख उदाहरण आहे. भूकंपानंतर नव्याने वसवलेल्या गावात लोकवर्गणीतून सुमारे दीड कोटी रुपयांमध्ये उभारण्यात आलेल्या या मठात वर्षभर सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे:
-
सकाळी ६ वाजता: श्री वीरभद्रेश्वर मूर्तीवर रुद्राभिषेक
-
सकाळी ८ वाजता: श्री गुरु पाद्यपूजा व मठाधीशांना महावस्त्र प्रदान
-
यानंतर: मठाधीश श्री गंगाधर महास्वामीजी यांचे भक्तांना आशिर्वचन
-
सकाळी १० वाजल्यापासून: महाप्रसाद वाटप