महामोर्चा संदर्भात लोहारा शहरात लिंगायत समन्वय समितीची बैठक

HTML img Tag Simply Easy Learning

लोहारा (प्रतिनिधी) : लिंगायत समाजाला लिंगायत धर्मास संवैधानिक मान्यता द्यावी. तर केंद्र व राज्य सरकारने अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी मुंबई येथे लिंगायत महामोर्चा होणार आहे. त्या संदर्भात लिंगायत समन्वय समितीची बैठक लोहारा येथे पार पडली.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर प्रथमच मुंबई येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
१)लिंगायत धर्माला संविधानीक मान्यता द्या
२)लिंगायत धर्मियांना अल्पसंख्याक दर्जा जाहीर करा.
३) महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा.
४) मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारक काचे काम त्वरित करा.
५) विधानसभा परिसरात महात्मा बसवेश्वरांचा असवरूड पुतळा उभा करा.


या प्रमुख मागण्यासाठी दि.२९ जानेवारी मुंबई येथील आझाद मैदानावर महामोर्चा आयोजित केला आहे. तरी महामोर्चात सहभागी होण्यासंदर्भात अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती राष्ट्रीय समन्वयक अँड.अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहारा येथील महात्मा बसवेश्वर मंदिरात ९ जानेवारी रोजी बैठक संपन्न झाली.

यावेळी माजी सरपंच नागन्ना वकील,माजी सरपंचशंकर अण्णा जट्टे, दत्तात्रय बिराजदार,शंकर वकील, जालिंदर कोकणे, बलू स्वामी,विश्वनाथ माशाळकर,हरी लोखंडे,दिपक मुळे,मल्लिनाथ घोंगडे,बसव ब्रिगेड जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील,गणेश खबोले, वीरभद्र फावडे, महेश पाटील, गजेंद्र सुतार, लक्ष्मण भुजबळ,भरत सुतार,प्रभुलिंग बस्टे, रामेश्वर वैरागकर,राजकुमार स्वामी, राजु कोराळे,नागेश वकील,देवप्पा भुजबळ, जीवन गिराम, शिवहर स्वामी, चंद्रकांत भुजबळ,संदीप पाटील यांच्यासह लोहारा शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!