लोहारा ( धाराशिव ) : खरीप 2022 मधील राज्य राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या आदेशानंतर ही पंचनामाच्या प्रति न देणाऱ्या भारतीय कृषी विमा कंपनी विरोधात 21 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याची माहिती विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी दिली आहे.
खरीप 2022 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील सहा लाख 68 हजार 453 अर्जदार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. केंद्रीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून गेल्या वर्षी पिक विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ 50 टक्के रक्कम दिली होती या विरोधामध्ये अनिल जगताप यांनी जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय समितीकडे याचिका दाखल करून शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लावून घेतला होता.
राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 294 कोटी रुपये, पंचनामेच्या प्रती व बाद केलेल्या 1 लाख 40 हजार पूर्व सूचनाचे फेरस रक्षणाचे आदेश दिले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी महसुली कारवाई करून कंपनीकडून 294 कोटी रुपये वसूल करून घेतले मात्र पंचनामेच्या प्रति व बात केलेल्या पूर्वसूचनाचे फेरसर्वेक्षण कंपनीने केलेच नाही.
जिल्हा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत पंचनामेच्या प्रतीची मागणी कंपनीकडे केली असता अशा प्रती देण्याची तरतूद नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले तर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचा आदेश अंतिम असतो असे अनिल जगताप यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले यावर जिल्हाधिकारी यांनी राज्य तक्रार निवारण समितीचा आदेश कंपनी पाळत नसले बाबत कृषी सचिव व कृषी आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे कळवावे असे कृषी विभागास आदेशित केले.
का महत्त्वाच्या आहेत पंचनामेच्या प्रती.
पिक विमा कंपनीने जे पंचनामे ते पंचनामे नंतर बदलले असून शेतकऱ्यांना असमान पद्धतीने व अतिशय अल्प रक्कम दिलेली आहे. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकरी पद्मराज गडदे व धाराशिव तालुक्यातील शेतकरी अमोल माने यांनी माहिती अधिकारात वर्षभर कष्ट घेऊन पंचनामे च्या प्रती मिळविल्या आणि त्यांना धक्काच बसला कारण गडदे यांच्या पंचनामावर 95 टक्के नुकसान भरपाई नमूद केली आहे त्यांचे क्षेत्र 6 हेक्टर 7 आर इतके असूनही त्यांना केवळ 74 हजार रुपये दिले आहेत प्रत्यक्षात त्यांना तीन लाख पाच हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे. तर दुसरे शेतकरी अमोल माने यांच्या पंचनाम्यावरील स्वाक्षरी बोगस आहेत त्यांच्या टक्केवारीची व स्वाक्षरीची कागदपत्रे विमा कंपनीने बदलले आहेत त्यांचे एकूण सात खात्यांना एक हजार रुपये पेक्षाही कमी रक्कम आहे. जर खऱ्या पंचनामाच्या प्रति हातात पडल्या तर धाराशिव शेतकऱ्यांना पाचशे कोटी रुपये पेक्षा जास्तीची रक्कम मिळेल.
भारतीय कृषी विमा कंपनी ही केंद्राची असल्याने अधिकारीही तेवढ्या ताकतीने कंपनीविरुद्ध पावले उचलत नाहीत म्हणून शेवटी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत असल्याचे जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.