व्हाट्सअप वरील स्टेट्सवर डीपीवर धगधगती मशाल चिन्ह

उमरगा (उस्मानाबाद) / नारायण गोस्वामी
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह जाहीर झाल्यापासून उमरगा – लोहारा तालुक्यात सोशल मीडियावर धगधगती मशाल हे चिन्ह प्रचंड व्हायरल झाले आहे . तर शिवसैनिकांनी ,शिंदेगट व दोन्ही कॉंग्रेसच्या ‘ काही’ कार्यकर्त्यांनी आपल्या व्हाट्स अप वरील स्टेट्सवर डी पी वर धगधगती मशाल चिन्ह ठेवले आहे .
केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव दिले तर धगधगती मशाल हे चिन्ह दिले . तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव दिले .
निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह जाहीर करताच संपूर्ण महाराष्ट्रात व उमरगा लोहारा तालुक्यात शिवसैनिकांनी , शिंदे गटाच्या व दोन्ही कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यानी व्हाट्स अप वरील आपल्या स्टेट्सवर व डी पी वर मशाल चिन्ह ठेवले आहे . तर अनेकांनी फोटोशॉप वापरून उद्धव ठाकरे व मशाल असे ठेवले आहे . सध्या सोशल मीडियावर मशाल हे चिन्ह प्रचंड धुमाकूळ घालत आहे . तर अनेक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे प्रति आपली निष्ठा व्यक्त करताना,फेसबुक,इंस्टाग्राम वर अनेक पध्दतीने मशाल व ठाकरे यांचे फोटो व्हायरल केले आहेत .
” उषकाल होता होता ,काळ रात्र झाली हे गीत व छगन भुजबळ हे १९८५ साली मशाल या चिन्हावर निवडून आले होते . असा मजकुर मोठ्या प्रमाणात ,सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला जात आहे . ज्या पध्दतीने धगधगती मशाल हे चिन्ह सोशल मीडियावर व्हायरल होते आहे ,हे पाहता सर्वसामान्य जनतेपर्यंत मशाल चिन्ह पोहोचण्यास सोशल मीडियाचा मोठा हात आहे .