पुस्तकांची गुढी उभारून नवं वर्षाचं स्वागत

लोहारा : नागूर ता.लोहारा येथे अस्मिता बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते यशवंत चंदनशिवे यांच्या पुढाकारातून नव्या पिढीला नवा विचार देण्यासाठी शिक्षणांचं महत्त्व ग्रामीण भागात रूजविण्यासाठी आणि वाचन संस्कृती ग्रामीण भागात रूजविण्यासाठी गेल्या वर्षी पासून गुढीपाडव्याच्या निमित्ताने गावातील हनुमान मंदिराच्या चौथा-यावर पुस्तकांची गुढी उभारून नवं वर्षाचं स्वागत करण्यात येत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

पुस्तकांची गुढी उभारून युवक -युवतीने मोबाईलचा वापर कमी करून वाचन संस्कृतीकडे वळावे असे अवहान सामाजिक कार्यकर्ते यशवंत चंदनशिवे यांनी गुढी उभारल्या नंतर तरूणांनाना अवहान केले. यावेळी पुस्तकाच्या गुढीची पुजा ज्येष्ठ नागरिक व वाचक श्री. शाहुराज भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.यशवंत चंदनशिवे, शिवाजी मोरे, दादासाहेब मोरे, संजय जावळे, जनार्दन पाटील, चंद्रकांत पाटील, महेश जावळे, बाळासाहेब भोसले श्री.धनराज जाधव, श्री. दगडू पाटील कु. आराध्या चंदनशिवे, कु.शोर्य सुशिल चंदनशिवे आदि जेष्ठ नागरिक, तरूण, विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!