धाराशिव

लोहारा शहर बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

लोहारा ( जि.धाराशिव ) : 
परभणी येथील संविधान प्रेमी युवकाचा कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणाच्या निषेधार्थ लोहारा तालुका कडकडीत बंद पाळण्यात आला. शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांना श्रध्दांजली अर्पण करून लोहारा बंदचे आवाहन केले. त्याला व्यापार्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
परभणी येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या संविधान प्रेमी आंदोलकांवर पोलीसांनी अमानुष पणे लाठीचार्ज केला.संविधान प्रेमी युवकांचे भवितव्य उध्वस्त करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

कोंबिंग ऑपरेशन करून निष्पाप युवकांना जाणीव पूर्वक अटक करण्यात आली.व त्यांना पोलीसांनी अमानुष पणे मारहाण केली. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत शहीद सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला आहे. संविधान विटंबना प्रकरण व शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी, एस. आय. टी. मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, याप्रकरणी निष्पाप लोकांना मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह दोषी पोलीसांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसाह्य द्यावे, त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी देवुन कुटुंबाचे पुनर्वसन करावे, वत्सलाबाई मानवते यांना पोलिसांनी गंभीर स्वरूपाची मारहाण केली असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये अर्थसाह्य देवून त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे, संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागण्यांसाठी सर्व जाती-धर्मीय संविधान प्रेमी नागरिकांनी लोहारा तालुका बंदची हाक दिली होती. त्यामुळे तालुक्यातील सर्वस्तरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लोहारा शहर, जेवळी, सालेगाव, आष्टामोड यासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning

सकाळी 9:30 वाजता लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी बाजार पेठेत फेरी काढून बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यापारी, व्यवसायिक, नागरिकांनी स्वेच्छेने दुकाने बंद ठेवली. लोहारा तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत कांबळे रिपाइं (आठवले )तालुका अध्यक्ष दिगंबर कांबळे, ए. आय. एम. आय. एम. चे तालुका अध्यक्ष अमिरहमजा खुटेपड, रिपाइं (A) तालुका अध्यक्ष अमित सुरवसे,आझाद ग्रुपचे अध्यक्ष अल्ताफ सुंबेकर,युवा रिपाइं तालुका सचिव बालाजी माटे, रिपाइं तालुका कार्याध्यक्ष किशोर भालेराव, माजी नगरसेवक शामसुंदर नारायणकर,पंकज सोनकांबळे,लक्ष्मण रोडगे,प्रितम शिंदे, शैलेश कांबळे, रोहीत शिंदे,संभाजी सुरवसे, सुमित कांबळे, निवृत्ती थोरात, अरबाज फकीर, राजू ढगे, सबीर सय्यद, रमेश राठोड, स्वप्निल माटे, अतुल कांबळे, सुरज माटे, अंकुश भंडारे, विनोद थोरात,अक्षय माटे,ओंकार कांबळे,शिवतम रोडगे,संभाजी जवादे,मेसा रोडगे यांच्यासह संविधान प्रेमी नागरिक उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!