तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे जेवळी येथे उद्घाटन

लोहारा : जेवळी येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या फक्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उदघाटन सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून श्री.आशोक भुसणे अध्यक्ष जेवळी एज्युकेशन सोसायटी जेवळी हे तर प्रमुख अतिथी म्हणून लोहारा तालुक्याच्या गट विकास अधिकारी श्रीमती शितल खिंडे मॕडम,सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.गायकवाड साहेब, गटशिक्षणाधिकारी रंजना मैंदर्गी मॕडम उपस्थित होते.
यावेळी कार्यालयीन शिक्षण विस्तार अधिकारी श्री.भास्कर बेशकराव,श्री.सुभाष चव्हाण विस्तार अधिकारी बीट लोहारा सर्व केंद्रप्रमुख व लोहारा तालुक्यातील क्रीडा शिक्षक, विषय साधन व्यक्ती,खेळाडू व सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कमलाकर येणेगुरे यांनी केले तर आभार श्री.पाटील आर.व्ही.यांनी मानले.