लोहारा ( जि.धाराशिव ) : उमरगा तालुक्यातील पिककर्ज व शासकीय योजनांच्या कर्ज प्रकरणातील अडचणी बाबत आज दि.२९/०७/२०२४ रोजी तहसील कार्यालय, उमरगा येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली *आढावा बैठक* संपन्न झाली.
याबैठकीत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शेतकऱ्यांच्या पीक कर्ज संबंधीच्या समस्यासंदर्भात सर्व बँक अधिकाऱ्यांना बँकांना दिलेले पीक कर्जाचे उद्दीष्ठ लवकरात लवकर (100%) पूर्ण करण्यात यावे, शेतकऱ्याने पिक कर्जाचे पुनर्गठन करून घेतल्यानंतर लागलीच त्यांना 4 दिवसात कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे, KCC लोनसाठी सिबिल स्कोअरची अट रद्द करणे, पीक कर्ज देण्यासाठी इतर बँकाचे बेबाकी प्रमाणपत्र घेण्याऐवजी स्टॅम्प वरती शेतकऱ्याचे हमी पत्र घ्यावे, कर्जासाठी लागणारी कागदपत्रांची यादी दर्शनी भागात मोठा फ्लेक्स करून लावणे,गटसचिव यांनी तत्पर व कार्यशील राहणे गरजेचे, ऊसावरील kcc लोनसाठी कारखान्याचे पत्र घेण्याची अट रद्द करणे, KCC लोन परतफेड मुदत वाढवून ५ वर्षे करणे, ज्या शेतकऱ्यांचे KCC लोन थकीत आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाचे येणारे अनुदान बँक देत नाही त्यांना ते अनुदान तात्काळ वितरीत करण्यात यावे, पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे घालावे लागणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच शासनाने ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेत सर्व पीक कर्ज वाटप करणे आदीबाबत सूचना केल्या.
या बैठकीस तहसीलदार गोविंद येरमे, नायब तहसीलदार रतन काजळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, अरूण जगताप व तालुक्यातील सर्व बँकाचे व्यवस्थापक, शेतकरी, पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.