अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 12 छापे

धाराशिव : पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल शुक्रवार दि.29.12.2023 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 12 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 1,000 लि. आंबवलेले रासयनिकद्रव्य हे नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आले. तर सुमारे 725 लि. गावठी दारु, सिंधी ताडी अम्ली द्रव 95 लि. देशी विदेशी दारुच्या 107 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 1,29,295 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 12 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1)बेंबळी पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे -1)रामलिंग जरीचंद गायकवाड, वय 45 वर्षे, रा. पाथरी ता. बार्शी, हा.मु. हॉटेल राजगड रुईभर ता. जि. धाराशिव, हे दि.29.12.2023 रोजी 17.15 वा. सु. हॉटेल राजगड समोर शेत शिवार रुईभर ता. जि. धाराशिव, येथे अंदाजे 700 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. 2)अक्षय हरिबा जाधव, वय 25 वर्षे, रा. मेंढा ता. जि. धाराशिव, हे दि.29.12.2023 रोजी 19.30 वा. सु. मेंढा पाटी येथे औसा धाराशिव रोड शेजारी अंदाजे 3,550 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 40 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
2)मुरुम पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे -1)गोविंद हणुमंत राठोड, वय 55 वर्षे, रा. नाईकनगर सु. ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.29.12.2023 रोजी 16.40 वा. सु. विठ्ठलसाई सहकारी कारखाना सुंदरवाडी समोररोड लगत अंदाजे 7,600 ₹ किंमतीचे 76 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 2)सोनम्मा हणमंत सगर, वय 45 वर्षे, रा. हिलापूर ता. जि. बिदर ह.मु. कडदोरा ता. उमरगा जि. धाराशिव, हे दि.29.12.2023 रोजी 19.20 वा. सु. कडदोरा येथे अंदाजे 9,500 ₹ किंमतीचे 95 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
3)शिराढोण पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे -1)दिपक रावसाहेब मुंडे, वय 24 वर्षे, रा. गोविंदपुर ता. कळंब जि. धाराशिव, हे दि.29.12.2023 रोजी 19.40 वा. सु. गोविंदपुर येथील हॉटेल आप्पाचा ढाबा शेड शेजारी अंदाजे 490 ₹ किंमतीचे देशी विदेशी दारुच्या 7 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. 2)बापु मारुती चव्हाण, वय 37 वर्षे, रा. नायगाव ता. कळंब जि. धाराशिव, हे दि.29.12.2023 रोजी 19.50 वा. सु. नायगाव येथे मुरुड रोड लगत शेडच्या बाजूला अंदाजे 630 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 9 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
4)ढोकी पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे -1)शामल राजा पवार, वय 45 वर्षे, रा. पारधी पिडी तेर ता. जि. धाराशिव, हे दि.29.12.2023 रोजी 17.00 वा. सु. पारधी पिडी तेर येथे अंदाजे 36,600 ₹ किंमतीचे 600 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
5)नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे -1)सचिन शिवराम इरवाडकर, वय 44 वर्षे रा. चांभार गल्ली हन्नुर ता. अक्कलकोट ह.मु. इटकळ ता. तुळजापूर जि. धाराशिव, हे दि.29.12.2023 रोजी 18.50 वा. सु. इटकळ ते अक्कलकोट रोडच्या बाजूला हॉटेल पुनेरी च्या बाजूला अंदाजे 945 ₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या 27 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
6) भुम पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे -1)रत्नमाला सोपान काळे,वय 55 वर्षे, ता. जि. धाराशिव या दि.29.12.2023 रोजी 14.45 वा. सु. भुम येथे अंदाजे 8,500 ₹ किंमतीचे 200 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 25 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
7) अंबी पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे -1)अनिल मचिछंद्र गायकवाड, रा. मुगाव ता. परंडा जि. धाराशिव हे दि.29.12.2023 रोजी 18.00 वा. सु. मुगाव फाटा येथे शुभांगी हॉटेलच्या आडोशाला अंदाजे 980₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
8) येरमाळा पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे -1)रामा वामन कदम, वय 42 वर्षे, रा. रत्नापुर ता. कळंब जि. धाराशिव हे दि.29.12.2023 रोजी 11.45 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर रत्नापुर येथे अंदाजे 38,400 ₹ किंमतीची 600 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
9) तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे -1)अंबादास केशव भोवाळ, वय 65 वर्षे, रा. कसई ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.29.12.2023 रोजी 19.00 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर कसई ता. तुळजापूर येथे अंदाजे 1,400 ₹ किंमतीची 14 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
10) कळंब पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे -1)सुमित्राबाई कल्याण पवार, वय 60 वर्षे, रा. मार्केट यार्ड पाणी टाकी जवळ कळंब ता. कळंग जि. धाराशिव या दि.29.12.2023 रोजी 20.05 वा. सु. मार्केट यार्ड पाणी टाकी जवळ कळंब येथे अंदाजे 20,000 ₹ किंमतीचे 200 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.