रमाई घरकुल आवास योजनेप्रमाणे आडीच लाख रूपये अनुदानात वाढ करा – प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड

धाराशिव : यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल योजनेतील घरकुल बांधकामाच्या अनुदानात रमाई घरकुल आवास योजने प्रमाणे आडीच लाख रूपये अनुदानात वाढ करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे. की, वरील विषयांस अनुसरून संदर्भिय शासन निर्णय क्र.1 नुसार धाराशिव जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना हक्काचे पक्के घर देण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या माध्यमातून मंत्रालयीन स्तरावर एकूण 2159 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंत्रीसाठी सादर करण्यात आलेले होते. त्या प्रस्तावांना मान्यता आणि घरकुल बांधकामाच्या अनुदानासाठी लागणान्या निधीसही मंजूरी मिळालेली असल्याने प्रथमतः जिल्हाधिकारी, संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त सदरची योजना यशश्वी करण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना, गोरगरीब बेघरांना सहारा देण्यासाठी रात्रीचे दिवस करून या योजनेस सफल करण्यासाठी मोलाचे आधारस्तंभ असणाऱ्या समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी महोदयांचे समस्त बंजारा समाज आणि संघटना, परिवारांच्या वतीने शतशः आभार
महाराष्ट्रात विमुक्त जाती,भटक्या जमाती प्रवर्गाची संख्या ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विखुरलेले असून या प्रवर्गाकडे उत्पादनाची इतर साधने उपलब्ध नसल्याने ते सत्तन भटकती मोलमजूरी, ऊसतोड, पारंपारिक घ्यवसायांवर अवलंबून आपले आणि कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवितात, याची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने स्थलातर होईल त्या ठिकाणी निसर्गाला आपले घर मानत पालात, तांडा, वाडी वस्तीवर विखुरलेले असल्याने अद्यापही यांना शासनाकडून कायम स्वरुपाची घरकुल योजना मिळालेली नसल्याने एकत्रित स्थिरावलेला नाही तरी यांना मिळणाऱ्या योजनेच्या अनुदानामध्ये भरीव तरतूद करून द्यावी. विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्याना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या घरकुलाच्या 1 लाख 20 हजार रुपये अनुदानात वाढत्या महागाईच्या काळात घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी अशक्यप्राय असल्याने सदरच्या अनुदानात रमाई घरकुल आवास योजनेतील घरकुल बांधकामास देण्यात येणाऱ्या आडीच लाख रुपयाच्या प्रमाणात वाढ केल्यास यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे पक्क्या घरकुलाचे बांधकाम करण्याचे स्वप्न साकार होतील. यांचा विचार करून मागणीप्रमाणे अनुदानात वाढ करून देण्यासाठी आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड यांनी केली आहे.