स्पर्श ग्रामीण रुग्णालय येथे कॅन्सर तपासणी शिबीर संपन्न ; ३३६ महिलांची तपासणी

लोहारा : कॅन्सर चे निदानासंबधीच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागात कॅन्सरचे निदान लवकर होत नाही महिला हा आजार अंगावर काढतात पांढरा पदर जाणे, स्तनात छोटी गाठ असणे या कडे दुर्लक्ष करतात त्यामुळे लवकर निदान होत नाही व लवकर उपचार होत नाहीत. आजार खूप वाढल्यानंतर डॉक्टरांकडे तपासणीसाठी जात्तात पण तो पर्यंत आजार खूप बळावल्यामुळे रुग्णाला धोका उधभवू शकतो आणी उशीर झाल्यावर यासाठी खर्च हि खूप होतो. दिवसेंदिवस कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत, म्हणून वेळीच कॅन्सरचे निदान होण्यासाठी शंका आल्याबरोबर लगेच तपासणी केल्यास लवकर निदान होऊन प्राथमिक पातळीला औषधोपचारानी हा आजार बरा होतो त्यामुळे न घाबरता महिलांनी/ पुरुषांनी तपासणीसाठी पुढे यावे असे आवाहन श्री रमाकांत जोशी प्रकल्प अधिकारी स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांनी केले.
दि. १५ मार्च २०२३ रोजी स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर, फिरते वैद्यकीय पथक अंतर्गत कॅप्री ग्लोबल व आदित्य बिर्ला कॅपिटल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व मा. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या सुचनेनुसार राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.प्रा.डॉ.श्री. तानाजीराव सावंत साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त महिला दिनाचे औचित साधून ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूर येथे मोफत भव्य कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बार्शी येथील नर्गिस दत्त मेमोरियल हॉस्पिटल तज्ञ डॉक्टरांच्या चमू ने महिलांची स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग तसेच महिला/पुरुष यांची मोखिक आरोग्य तपासणी केली या सामाजिक उपक्रमात ३३६ महिलांची स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग यासाठी तपासणी करण्यात आली. लातूर यथील श्री सिद्धेश्वर कॅन्सर निदान केंद्रच्या टीम मार्फत या महिलांचे गरजेनुसार सँम्पल तपासणीसाठी घेण्यात आले. या ३३६ महिलांमधून ३ संशयित महिलांना पुढील तपसणी व उपचारांसाठी नर्गिस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल संदर्भित करण्यात आले.
या शिबिराला ग्रामीण रुग्णालय स्पर्शचे प्रकल्प अधिकारी श्री रमाकांत जोशी, स्त्रीरोग तज्ञ डॉ मीरा देशपांडे व डॉ मैत्री तावशिकर, बार्शी कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ नंदकुमार पाणसे, कॅन्सररोग तज्ञ डॉ राजेश्वरकर व श्रीम. पाणसे मँडम, सिद्धेश्वर कॅन्सर निदान केंद्र लातूरचे पँथाँलाँजीस्ट डॉ सचिन इंगळे, श्री. विजय भोजने, ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूरच्या सर्व परिचारिका तसेच फिरत्या वैद्यकीय पथकाचे सर्व डॉक्टर्स व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले सामाजिक उपक्रमाची जान ठेऊन महिलांसाठी असे शिबीर आयोजित केल्याबद्दल महिलांनी स्पर्शचे आभार मानले. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन श्री. अच्युत अदटराव यांनी केले.