चंपाषष्ठी महोत्सवाच्या निमित्ताने तपसेचिंचोलीत रक्तदान शिबीर संपन्न

किल्लारी (ता.औसा ) / प्रशांत नेटके
माऊली ब्लड बँक लातूर व श्री खंडोबा देवस्थान तपसे चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी तपसे चिंचोली येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. या रक्तदान शिबीरात जवळपास 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. रामचंद्र केदार ,बीट अंमलदार शेख , गावचे उपसरपंच युवराज यादव , ग्रामपंचायत सदस्य नितीन कवठाळे ,प्रवीण कांबळे ,माजी सरपंच मारुती नेटके ,म्हाळाप्पा कोरे ,मोहन नेटके , शिवशंकर शिंदे , समीर मोरे ,प्रमोद नेटके उपस्थित होते.
रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी माऊली ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी बालाजी जाधव , रोहिणी काथळे , नीता साळुंखे , आरती कांबळे ,प्रशांत नेटके ,रक्तदाते नागेश लादे ,दत्ता कांबळे , सूरज सगर, मोहन पांचाळ , नामदेव दळवे ,अझहर फकीर , सुषमा शिंदे ,संतोष सरवदे ,विनोद नेटके , जयशंकर मोरे ,दिगंबर कांबळे, अवधूत नेटके ,महेश चव्हाण ,सिताराम शिंदे ,प्रदीप नेटके आदींनी सहकार्य केले .