गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक अभियाना अंतर्गत व होऊ दे चर्चा या माध्यमातुन आरणी येथे बैठक संपन्न

 

लोहारा (जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यामध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक आरणी येथे ९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा घेण्यात आली.

शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व खा.ओमराजे निंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा तालुक्यातील गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक अभियाना अंतर्गत व होऊ दे चर्चा या माध्यमातुन आज आरणी या गावी बैठक घेण्यात आली.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी बोलत असताना शिवसेना शाखाप्रमुख,युवासेना शाखाप्रमुख यांनी करावयाची कामे काय असतात याचे सविस्तर विश्लेशन केले.तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्व शिवसैनिक नक्कीच आपली मदत तत्परतेने करतील याची ग्वाहीही नागरीकांना दिली.शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेल्या कार्याचा आढावा लोकांना सांगीतला.कोरोणा काळातील कार्याबद्दल मुख्यमंत्र्याच्या यादित पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धवसाहेबांचा पहिला नंबर होता.त्यावेळीचेही कार्य लोकांना सांगीतले.

HTML img Tag Simply Easy Learning

तसेच मा.खा.ओमदादा यांनी तळागाळातील नागरीकांशी जोडुन ठेवलेली नाळ व लोकांचे कार्य करण्याची पद्धत सर्व शिवसैनिकांनी याचा आदर्श घेऊन काम करावे ही विनंती केली.सर्वसामान्य लोकांचे कोणत्याही कामासाठी फोन उचलणारा भारतातील एकमेव खासदार म्हणुण ओमदादाची ख्याती आहे.

तसेच तसेच लोहारा तालुक्यातील अर्थव्यवस्था ही बहुतांश पणे शेतीवर चालणारी आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास दादा पाटिल यांनी शेतकर्याचे झालेले आर्थिक नुकसान भरुन काडण्यासाठी शेतकर्याच्या हक्काचा पिकविमा मिळाला नाही म्हणुन जे उपोषण केले त्याचे फलीत म्हणुन आज पिकविमा मिळाला आहे.यापुढिल काळातही शिवसेना शेतकर्याच्या पाठिशी खंबिरपणे उभी राहील याची ग्वाही दिली.

धाराशिव येथे एम.एस.ई.बि.कार्यालयावर शेतकर्याना सलग ८ तास उच्च दाबाने लाईट मिळावी यासाठी धाराशिव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. लोहारा तालुकात दुष्काळ जाहीर करावा व २५% रक्कम अग्रीम पिकविमा मिळावा यासाठी लोहारा तहसिलवर मोर्चा काडला याचे फलित मिळाले असेही सांगीतले.

यावेळी जेष्ठ शिवसैनिक मा.तात्याराव थिटे व शिवसेनेचे आरणीचे पहिले शाखाप्रमुख तानाजी थिटे यांची भेट घेऊन चर्चा केली. तानाजी थिटे यांची दोन्ही डोळ्यांची दृष्टी जाऊनही पक्षाच्या बैठकीला आवर्जुन उपस्थिती ही मनाला भावणारी गोष्ट होती.पक्ष आपल्या दोघांचा कायम ऋणी राहील.

नवनियुक्त शाखाप्रमुख ब्रम्हाणंद सोमवंशी व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करुण पक्षवाढिसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी जेष्ठ शिवसैनिक तात्याराव थिटे,आरणीचे पहिले शाखाप्रमुख तानाजी थिटे,शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,शहरप्रमुख सलीम शेख ,शिवदूत महेबूब गवंडी,आरणीचे शाखाप्रमुख ब्रम्हानंद सोमवंशी,किशोर थिटे,सदाशिव गिरी,आकाश थिटे,राहुल थिटे,गोरोबा थिटे,गणेश बरबडे,बाळासाहेब थिटे,सुरेश थिटे,सुभाष लादे,गुरुलिंग किणीकर, विश्वनाथ संगशेट्टी,गौतम राजपुत,महेश संगशेट्टी, सिद्धेश्वर तेली,रमेश थिटे,महादेव थिटे,दत्ता पाटिल,दत्ता थिटे,आप्पा बरबडे,रतन लोखंडे,नेताजी थिटे,प्रशांत लादे,चंद्रकांत भरगांडे,काशिनाथ थिटे,ओमप्रकाश संगशेट्टी,ए.बि.सोमवंशी,प्रदिप थिटे,शांतीरप्पा वेद्य, शिवाजी सोमवंशी यासह शिवसैनीक,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!