सेवानिवृत्त शिक्षकांनी टिव्ही, मोबाईलच्या भयानक व्यसनातुन मुलांना वाचवण्याचा उपक्रम राबवावेत – डॉ. सिद्रामप्पा खजुरे

आष्टा कासार (ता.लोहारा ) :- ग्रामपंचायत कार्यालय आष्टा कासार व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ना भूतो नी भविष्यती असा महासोहळा गावातील सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. या सत्कार सोहळ्यास उपस्थित 65 सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सिद्रामप्पा खजुरे साहेब समाजसेवक खुदावाडी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून भगीरथ नाना कुलकर्णी गुरुजी, महादेवप्पा नरे गुरुजी, सरपंच सौ.सुलभा कांबळे,उपसरपंच वसंतराव सुलतानपूर गुरुजी हे होते. या महासोहळ्यात सेवानिवृत्त शिक्षकांचा ट्रॉफी, शाल, श्रीफळ व बुके देऊन सहपत्नीक सत्कार करण्यात आला.या सत्कारामध्ये प्राचार्या पासून ते अंगणवाडी ताई पर्यंत सेवानिवृत्त शिक्षक सहपत्नी हजर होते. या वेळी नाना गुरुजी यांनी सेवा निवृत्त शिक्षकांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. महादेव नरे गुरुजी यांनी आजचा शिक्षक व शिक्षण पद्धती व समाज यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांनी आजच्या लहान मुलांच्या टीव्ही, मोबाईलच्या व्यसनावर व पालकांच्या दुर्लक्षावर बहुमोल असे मार्गदर्शन केले. प्रत्येक पाल्यांनी दररोज संध्याकाळी आपल्या गावातील टीव्ही व मोबाईल दोन तास बंद ठेवुन आपल्या पाल्यांचा अभ्यास घ्यावा. त्यांना अभ्यासाची आवड निर्माण करावी.अशी सखोल अभ्यास पूर्वक माहिती सर्व उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमासाठी मुंबई, पुणे, सोलापूर, पंढरपुर, लातुर, उस्मानाबाद, उमरगा, अशा ठिकाणी मुलांच्या नोकरीसाठी नातवाच्या शिक्षणासाठी स्थलांतरित झालेले आष्टा नगरीचे सेवानिवृत्ती शिक्षक आवर्जून आपल्या माय भूमीत या भव्य दिव्य सोहळ्याला हजर झाले. हा सुंदर सोहळा पाहून भारावून गेले. या वेळी विष्णूपंत सगर गुरुजी, कांतराव सोमवंशी सर यांनी सत्कार मूर्तीचे प्रतिक्रिया मनोगतात व्यक्त केले. सरपंच, उपसरपंच यांनीही आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाची संकल्पना उपसरपंच श्री. वसंतराव सुलतानपूरे गुरुजी यांची होती ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी सिद्रामप्पा तडकले गुरुजी,माजी सरपंच सुनिल सुलतानपूरे, विष्णुपंत सगर गुरुजी, व सरपंच सौ सुलभाताई कांबळे, उपसरपंच वसंतराव सुलतानपूरे, ग्राम विकास अधिकारी मातोळे साहेब, व सर्व सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.तसेच नितीन अष्टेकर,अमोल सोमवंशी, पंढरी पाटील, चतुर्भुज कागे,सतीश मोटे, खाजा खैराटे, सुभाष शिदोरे, यांनी परिश्रम घेतले.मुकेश सोमवंशी सर,अरविंद पोतदार, कु.दिपाली बलसुरे यांनी अतिउत्कृष्ट कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. आभार नितीन अष्टेकर सर यांनी मांडले.