हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यास आमदार ज्ञानराज चौगुले यांची भेट

लोहारा : लोहारा शहरातील प्रभाग १४ मधील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यास आमदार ज्ञानराज चौगले यांनी शुक्रवारी (दि.९) भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
लोहारा शहरातील प्रभाग १४ मध्ये जुन्या तहसील कार्यालयाच्या पाठीमागे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या दवाखान्यास आ. चौगुले यांनी भेट देऊन पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना केल्या. प्रभागातील नागरिकांनी या दवाखान्याचा लाभ घेऊन आपले आरोग्य व्यवस्थित ठेवावे असे आवाहन केले.

यावेळी नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेविका कमल भरारे, शामल माळी, आरती गिरी, नगरसेवक जालिंदर कोकणे, अविनाश माळी, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. रहीम शेख, जिल्हा आशा समन्वयक सतिश गिरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया जाधव, समुपदेशक प्रविण कांबळे, आरोग्य सहाय्यक शिंदे, दादा इंगळे, दत्ता थोरात व आशा कार्यकर्ती शाजीदा शेख आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!