महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त….

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाच्या जडणंघडणीत मोठे योगदान राहिले आहे. मात्र त्यांच्या अनेक पैलू वर अद्याप ही म्हणावा तसा प्रकाशझोत टाकण्यात आलेला नाही. घटनाकार, अर्थतज्ञ्, पत्रकार, संसदपटू, वक्ते, दलितांचे कैवारी, ओबीसीचे तहरणंहार कामगार व कर्मचाऱ्यांचे सन्मानकर्ते, भारताचे पहिले कायदामंत्री, लेखक, विचावंत, तत्वज्ञ, थोर समाज सुधारक, नद्या जोड प्रकल्प, पाणी साठावणे अन त्याचे जपणूक करुने , शेतकरी समृद्धी साठी पाणी हे जीवन,समाज प्रोबोधनकर अशा काही पैलूवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोलाचे कार्य केले.1942 ते 1946 या काळात डॉ. आंबेडकर व्हाईसरायच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होते. आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास तर कामगार, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम जलसंपदा आदी खात्याचे केंद्रीय कैबिनेटमंत्री होते. या सर्व खात्यावर त्यांचा प्रभाव दिसून येतो.2000 वर्षापर्यंत किती वीज, किती पाणी लागेल याचा अभ्यास त्यांनी 1946 मध्ये करून त्या दृष्टीने त्यांनी पावले उचलली होती. पिण्यासाठी पाणी, शेतीसाठी पाणी व जलवाहतुकीसाठी, पर्यटनासाठी (वॉटर पार्क ) लागणारे पाणी साठव्याचे कसे, पुरव्याचे कसे याचे शास्त्रशुद्ध नियोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी केले होते. भारतात एकच वेळी काही राज्यामध्ये महापूर येतो व दुसऱ्या काही राज्यामध्ये पाण्याचा दुष्काळ पडलेला असतो हे दोन्ही प्रश्न सोडवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरानी देशायातील सर्व मोठया नद्या एकमेकींना जोडण्याची योजना मांडली . पूर नियंत्रण आणि दुष्काळ निवारण करण्याची ही महत्वाकांशी योजना पाठीब्या अभावी पुढे येऊ शकली नाही.तरी एक ना एक दिवस या योजनेचा आपल्या सरकारला विचार करावा लागणार आहे आणि ती वेळ आज आपणास खुणावात आहे. ऊर्जा, जलसंपदा खात्याने प्रभाविपने कार्य केल्याशिवाय जागतिक पातळीवर विकासाच्याबाबतीत देश मुसंडी मारू शकत नाही. याचे भान देशाला देणारे पहिले राष्ट्रीय नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होय. देशाला जळसाक्षरता आणि ऊर्जासाक्षरतेचे धडे 1942 ते 1946 या काळात त्यांनी गिरव्याला शिकवले. जर ही दूरदृष्टी आपण आपण गाभीर्याने ओळखून शकलो असतो, ना शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसते ज्या पूर्वस्पृश्य समाजाला उच्च जातीननि पाण्याच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवले आणि ज्यांनी गुलामीच्या अंधारात ढकलेले. त्यातून आलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना देशाला पुढे 100 वर्ष अविरत, प्रकाश (ऊर्जा )मुबलक पाणी मिळावे म्हणून अखंड चिंतन, नियोजन, उयोजन केलेलं बर
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचे उधारक म्हणून ओळखले जाते, तथापी त्यावेळी ओबीसी (इतर मागासवर्गीय ) मराठा या समाजासाठी केलेल्या महत्वपूर्ण योगदानाकडे देशाचे हवे तेवढं लक्ष गेलेले नाही. भारताचे कायदामंत्री म्हणून 1947 ते 1951 या काळात प्रामुख्याने राज्यघटना आणि ‘हिंदू कोडं बिल ‘ (महिला हक्क कायदा )तयार करण्यासाठी अपार परिश्रम घेतले. भारतीय संसदेने हिंदू कोडं बिल मंजूर न केल्याने. नाराज होऊन त्यांनी होऊन त्यांनी केंद्रीय कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला. या राजीनामाची आणखी चार करणे होती. त्यातील दुसरे कारण म्हणजे या देशातील कुणबी, माळी, तेली, साळी, धनगर, वंजारी, आगरी भंडारी, न्हावी, शिंपी, सोनार, सुतार, कुंभार यांच्यावरील अन्यायाकडे लक्ष वेदन. हे फारसे प्रकाशात आलेले नाही (त्यांचे संपूर्ण राजीनामापत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 14 पान क्र 1319 वर ओबीसी बाबत मजकूर आहे )डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, सरकारवर नाराज असल्याचे दुसर कारण सांगायचं मला खेद वाटतो कि, राज्यघटनेने इतर मागास वर्गाला कोणतेही घटनात्मक रक्षण दिले नाही.
डॉ. बाबासाहेब काळातील सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा तीव्र निषेध म्हणून कायदमंत्री पदाचा राजीनामा दिला. आजचे ओबीसी म्हणजे वर्णव्यवस्थितील शूद्र होते. शूद्र पूर्वी कोण होते? याचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रकाश टाकणारा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी 1946मध्ये पूर्ण केला. तो त्यांनी महात्मा ज्योतीराव फुले ना अर्पण केला. आणि भारताला राजकीय स्वातंय पेक्षा सामाजिक लोकशीही =स्वातंत्र्य )अधिक गरजेचे आहे. हे त्यांनी पटवून दिले. मागास वर्गासाठी 5 नोहेबर 1928 रोजी इंग्रज सरकारने एच बी स्टार्ट याच्या अध्यक्ष खाली एक कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीने सामाजिक स्थितीचा अभ्यास करून समझ्याच्या 1)अनु जाती 2)अनु जमाती 3) ओबीसी आहि वर्गीवारी केली डॉ. बाबासाहेब आंबेडकर या कमिटीचे सदस्य होते. या कमिटीच्या शिफाराशी वरूनच 1932 मध्ये या घटकच्या विकासासाठी मागासवर्गीय विकास खाते =समाजकल्याण खाते )निर्माण करण्यात आले. त्या मधून इतर मागास वर्ग व भेटके विमुक्त कल्याण विभाग तयार झाला. याच्या असंख्य याजेनाचे लक्षवधी लोक लाभार्थी आहेत. त्यांना तरी हा इतिहास कधी कळणार?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि, पश्चिचमातं देशात शोषक आणि शोषित असे फक्त दोन च वर्ग असतात, तसे होणे भारतीय समाजात सध्य स्थित तरी शक्य नाही. अस्पृश्य भारतीयाचे विषमतेचे फलित या प्रबंधात डॉ. बाबासाहेब सांगतात विषयामतेचा प्रश्न फक्त दोनच वर्गामध्ये असला.तर कनिष्ठ वर्ग उचवार्गी्यांनी लादलेल्या विषमते विरुद्ध सहज एक ध्येयाने एकत्रित येऊ शकतो, परंतु भारतीय समाजात चार्तूवर्णय निर्मित असंख्य जाती असून, त्यातील विषयामता ही जातीसापेक्ष असल्यामुळे प्रत्येक जात ही वरच्या, जातीपेक्षा कनिष्ठ असली तरी खालच्या जाती पेक्षा, ती स्वतःला श्रेष्ठ समजते. त्यामुळे भारतीय समाजात जातीव्यवस्था दीर्घाकाल ठीकवून राहिली आहे. सुवर्ण हिंदू मधील कष्टकरी, श्रम जीवावर्ग आर्थिक दृष्ट्या शोषित असून, समदुःखी असा शोषित अस्पृश्य समाजाशी ऐक्य साधू शकत नाही आणि त्यामागील प्रमुख कारण सुवर्ण हिंदुमधील जातीयतेची भावना होय. त्यासाठी जातीयेतेच निर्मूलन कसे करता येईल, यावर बाबासाहेबाना कल्पना होती म्हणूनच सध्य :स्थिती अस्पृश्यानि आपल्या उद्धरासाठी स्वतंत्र मार्ग शोधावा आणि तो मार्ग म्हणजे शिक्षण, राजकीय शक्ती प्राप्त करणे होय.
प्राचीन आणि उच्च म्हणून भारतीय संस्कृतीचे गोडवे गणाऱ्यांना डॉ. बाबासाहेब बजावतात कि संस्कृती दीर्घाकाळ ठीकुण राहणे महत्वाचे नाही, तर तिची उयोगिता महत्वाची आहेआणि आदीवासी, गुन्हेगार, जमाती अश्पृश्यता सर्वांगीण विकासापासून वंचित ठेवणारी सुवर्ण संस्कृती अपयशी ठरलेली आहे. डॉ बाबासाहेबांच्या मते पश्चिचमतंय भारतीय समाजाकडे फक्त भाषिक व धार्मिक दृष्टिकोनातून बघतात, त्यामुळे भारतात फक्त हिंदू व मुस्लिम असे दोनच प्रमुख वर्ग राहतात. असा त्यांचा गैरसमज होतो :परंतु भारतीय समाजामध्ये अजून ही तीन महत्वाचे परंतु दुर्लक्षित राहिलेले वर्ग दिसून येतात. भयंकर दारिद्र्य आणि शिक्षणाच्या आभावामुळे, अज्ञान -अंधश्रद्धा ने बहुजनाचे , दलितांचे, भेटके जमाती, गुन्हेगारी व ओबीसी यांचे जीवन कष्टामय, दुःखी झाले आहे बहुजन भारतीय शेतकऱ्यांच्याही शोषणाबद्दल विध्यार्थी दशेत अगदी वयाच्या चोवीसाव्या वर्षी बाबासाहेब लिहितात आणि शासक असलेल्या बिर्टीशचं आर्थिक शोषणाचे जुलमी सत्यदर्शन जगाला घडवतात. क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी देशासाठी, समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या सुखासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन, दीनदलितांना, बहुजनना जागृत करण्याचे महान कार्य केले. त्यांच्या त्याला अतुलनीय कार्याची वारसा चालवण्याची आज खरी गरज आहे.
के.एस.गायकवाड
सहशिक्षक
जि. प. कें. प्रा. शाळा कास्ती बु ता. लोहारा
जि. धाराशिव