औसा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा.काशिनाथ सगरे तर सचिव महेबूब बक्षी यांची बिनविरोध निवड

औसा / प्रतिनिधी
औसा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. काशिनाथ गुरुसिद्धप्पा सगरे ( दै.संचार) यांची तर सचिवपदी महेबूब बक्षी (दै.लोकमत) यांची शनिवार दि. 18 फेब्रुवारी दुपारी रोजी महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर येथील शासकीय विश्रामगृह औसा येथे बैठकीत बिनविरोध निवडक करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार रमेश दुरुगकर, राजू पाटील आणि संजय सगरे यांच्या समितीला सर्वानुमते अध्यक्ष व सचिव निवडण्यासाठी अधिकार देण्यात आले होते. बैठकीमध्ये अध्यक्ष आणि सचिव पदासाठी इच्छुक असलेल्या इच्छुकांच्या नावांमधून त्रिसदस्य समितीने ही बिनविरोध निवड घोषित केली. पत्रकार संघाच्या उर्वरित कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष रोहित हंचाटे (दै.गुरुधर्म) व बालाजी उबाळे ( दै.शुभदिन) सहसचिव पदी विनायक मोरे (दै.सामना) कोषाध्यक्ष इलियास चौधरी (दै. प्रजापञ) तर कार्यकारिणी सदस्य म्हणून रमेश दुरुगकर, राजू पाटील, संजय सगरे, राम कांबळे, विश्वनाथ गुंजोटे यांची निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये सर्वश्री रमेश शिंदे, सूर्यकांत बाळापुरे, महेश उसतुरे, एस ए काझी, विठ्ठल पांचाळ, समीर डेंग, किशोर जाधव, रामकृष्ण जाधव, वामन अंकुश, गिरीधर जंगाले, शिवाजी मोरे, आफताब शेख, रोहित सगरे, देविदास सुरवसे, यांच्यासह इतर पत्रकार उपस्थित होते.
अध्यक्ष सचिव व अन्य सदस्य निवडी नंतर सर्व नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्यांचा उपस्थित पञकारांच्या वतीने पुष्पहार घालून व पेढे भरवून सत्कार करण्यात आला.यानंतर सर्वच पञकारांनी महाशिवराञी चे औचित्य साधून ग्रामदैवत मुक्तेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.