लोहारा : ( जि.धाराशिव ) : माजी खासदार प्रा.श्री. रविंद्रजी गायकवाड, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती श्री. जितेंद्र शिंदे, लोहारा- उमरगा तालूक्याचे आमदार श्री. ज्ञानराज चौगुले, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सुलतान शेठ, युवा सेना निरीक्षक श्री. किरण गायकवाड,युवती सेना मराठवाडा निरीक्षक आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा शहरामध्ये विविध विकास कामे करून विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. असे नगरध्यक्षा सौ. वैशाली अभिमान खराडे यांनी मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परीषदेत सांगितले. यावेळी माजी नगरसेवक अभिमान खराडे उपस्थित होते.
पत्रकार परीषदेत केलेले कामे खालील प्रमाणे नगरध्यक्षा वैशाली अभिमान खराडे यांनी सांगितले.
१. नाना-नानी पार्क
२. नगरपंचायत नविन भव्य इमारत्त
३. ग्रामिण रुग्णालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जेवळी रस्ता महात्मा बस्वेश्वर चौकापर्यंत मुख्य नाली.
४. जुन्या गावामध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी कचरा डेपो उभा केला. कंम्पाऊंड यॉल व अंतर्गत रस्ते तयार केले.
५. लोहारा शहरामध्ये एखाद्या ठिकाणी आग लागली अथवा आपत्ती उद्भवली तर त्यासाठी आग विझविण्यासाठी अग्निशमन वाहन खरेदी करण्यात आली. व अग्निशामक वाहन लावण्यासाठी इमारत
बांधकाम करण्यात आले. व रस्ता बांधकाम करण्यात आले.
६. प्रभाग क्र. ११,१२ व ८ मध्ये लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क तयार करण्यात आले.
७. प्रभाग क्र.१७,५,११ व १२ मध्ये हायमस्ट लॅप व नविन विद्युत पोल बसवून त्यावर स्ट्रेट लाईट बसविण्यात आले.
८. लोहारा शहरामध्ये नविन ११ अंगणवाड्या मंजूर करून घेतल्या व कांहीचे बांधकाम चालू असून कांही पूर्ण झाले आहे.
९. लोहारा शहरामध्ये नागरिकांना रात्री अपरात्री चिखलामधुन जाण्याची समस्या भेडसावत होती त्याठिकाणी
सिमेंट रस्ते करून सदर समज्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत.
१०. कांही वार्डामध्ये सिमेंट नाल्या बांधकाम करण्यात आलेले आहेत व कांहीचे बांधकाम सुरु करीत आहोत. ११. लोहारा शहरामध्ये राम मंदीर बांधकामासाठी रु.२५.०० लक्ष निधी प्राप्त झालेला आहे. व त्याचे टेंडर प्रोसेस मध्ये आहे.
१२. लोहारा शहरामध्ये विठ्ठल मंदीर बांधकामासाठी रु.२५.०० लक्ष निधी प्राप्त झालेला आहे. व त्याचे टेंडर प्रोसेस मध्ये आहे.
१३. सदाशिव हिरेमठ याठिकाणी सभामंडप उभारणी करण्यात येत आहे.
१४. लोहारा शहरामध्ये सार्वजनिक स्मशानभुमी सुशोभिकरण करणे व कंम्पाउंड वॉल बांधकाम करणे कामे चालू आहेत.
१५. विरशैव कक्कय्या स्मशानभुमीचे संरक्षण भिंत व दहन भुमी चे काम चालू आहे.
१६. लिंगायत समाज स्मशानभुमीमध्ये स्ट्रिट लाईट व सभागृह बांधकाम चालू आहे.
१७. सर्व स्मशानभुमीमध्ये विंधन विहीर घेण्यात आले.
१८. नगरपंचायतीने स्वतःचे ट्रॅक्टर व ट्रॉली खरेदी केली.
१९. नगरपंचायतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी चार चाकी ७ गाड्या खरेदी करण्यात आल्या.
२०. आमदार निधीतून स्मशानभूमी लांब असल्यामुळे अंतविधी करण्यासाठी शव वाहिनी खरेदी करण्यात आली.
२१. महादेव मंदीर देवी मंदीर, गणपती मंदीर यांचे सभागृह प्रस्तावित आहेत. २२. प्रभाग क्र.३ मधील मातंगी देवीचे कट्टा व शेड चे काम चालू आहे.
२३. लोहारा शहरामध्ये महिलांसाठी व पुरुषासाठी मुतारी व शौचालयाची निघाले असून काम चालू करण्यात येत आहे. नविन बांधकाम करणेसाठी टेंडर २४. जुम्मा मस्जिद जवळ हुसेन बाशा सवारीसाठी सभागृह बांधकाम प्रस्तावित आहे.
२५. बारा इमाम सवारी सवारीसाठी सभागृह बांधकाम प्रस्तावित आहे.
२६. लोहारा शहरामध्ये मुख्य रस्त्यासाठी कास्ती ओक्यापासून मार्डी ओढ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जेवळी रस्ता कुलकर्णी पेट्रॉलपंपापर्यंत नाल्या व रस्त्याचे बांधकाम चालू आहे.
२७. लोहारा शहरामध्ये एकूण ४१ विंधन विहीर त्यापैकी व आमदार निधीतून ३६ बोअर घेण्यात आले. २८. निम्न तेरणा प्रकल्प माकणी येथून लोहारा बु. शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेस रु. ३४.०० कोटी मंजूर करण्यात आले.
२९. लोहारा शहरामध्ये विविध विकास कामे सुरु आहेत.
सौ. वैशाली अभिमान खराडे नगराध्यक्षा,नगर पंचायत लोहारा , ता.लोहारा, जि.धाराशिव
Back to top button
error: Content is protected !!