युवकांनी कायद्याविषयी सजग रहावे – न्यायाधीश श्री. एस. एस. कळसकर

लोहारा प्रतिनिधी : शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात तालुका विधी सेवा समिती, लोहारा व विधीज्ञ मंडळ, लोहारा यांच्या संयुक्त विद्यमानाने कायदेविषयक शिबिर व जागतिक युवा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री. एस. एस. कळसकर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर लोहारा तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, लोहारा यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती होती. प्रमुख उपस्थिती म्हणून वकील श्री. एम. यू. जट्टे, अध्यक्ष विविध मंडळ, लोहारा यांची उपस्थिती होती. मार्गदर्शनपर प्रमुख वक्ते म्हणून वकील श्री. आर. बी. जाधव सदस्य, विधीज्ञ मंडळ, लोहारा तसेच डॉ. अर्शद रजवी, प्राचार्य बिल गेट्स महाविद्यालय, उस्मानाबाद यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी युवकांनी सोशल मीडियाच्या आहारी न जाता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून यश संपादन करावे असे मत वकील श्री. आर. बी. जाधव यांनी व्यक्त केले तर सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करून वेगवेगळे स्किल्स आत्मसात करून स्वतःची प्रगती साधावी असा सल्ला प्राचार्य डॉ. अर्शद रजवी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला त्याचबरोबर युवा उद्योजक श्री राहुल मक्तेदार यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकीय क्षेत्रात असणाऱ्या संधी विषयी नाविन्यपूर्ण माहिती दिली तर न्यायाधीश श्री. एस. एस. कळस्कर यांनी विद्यार्थ्यांना विविध कायद्याविषयी माहिती देऊन सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी गिल्डा हिने केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा. चिकटे व्ही. डी. व डॉ. मोरे महानंदा यांनी विशेष मेहनत घेतली तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!