भातागळी येथे घरासमोरुन स्कुटर चोरीला ; अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल

उस्मानाबाद : पोलीसाकडून मिळालेली माहीती अशी की, भातागळी, ता. लोहारा येथील- गुंडुआबा हरिदास शिंदे यांची अंदाजे 45,000 ₹ किंमतीची स्कुटर क्र. एम.एच. 25 एव्ही 3104 ही 2 डिसेंबर रोजी ८ ते 3 डिसेंबर रोजी ६ वाजाच्या दरम्यान त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या गुंडुआबा शिंदे यांनी 13 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.