लोहारा शहरातून हजरत महम्मद पैगंबर याच्या जन्मदिनानिमित्त भव्य मिरवणूक

लोहारा / प्रतिनिधी
लोहारा शहरात ईमामूल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा सलल्लाहो तआला व अलैही व सल्लम
यांच्या जन्मदिवसानिमित्त ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथमतः शहरातील महेबूब सुभहानी दर्गा पासून सदर जुलूस काढण्यात आले या जुलूस मध्ये लहान चिमुकल्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.
या ईद ए मिलादुन नबी निमित्त साहेब मोहल्ला व इदगाह मस्जिद ठिकाणी सजावट करण्यात आली होती तर हा जुलूस छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आझाद चौक जगदंबा मंदिर मार्गे
ईदगाह मस्जिद या ठिकाणी धार्मिक विधीनुसार सांगता झाली.
या प्रसंगी महंमद फकीर यांच्याकडून अन्नदान करण्यात आले तर या रॅली प्रसंगी लहान चिमुकल्यांना खाऊ वाटप करण्यात आले या प्रसंगी सर्व मुस्लिम समाजाचे बांधव सहभागी झाले होते या जुलूस मध्ये नाते शरीफ यांचे पठण करण्यात आले.
या जुलूस मध्ये लहान चिमुकल्यांची लक्षणीय गर्दी उफाळून आली होती.
या ईद ए मिलादुन्नबी जुलूस प्रसंगी शहा हुसेन कादरी, हापीस शमशुद्दीन उस्मान सिद्धकी, जामा मस्जिद के सदर हैदर शेख, हापीस मैनुद्दीन ईमाम,गणी पेशईमाम, मैनुद्दीन पेशइमाम,उपनगराध्यक्ष आयुब शेख, ,हाजी बाबा शेख, हाजी तथा नगरसेवक अमीन सुंबेकर, शमशुद्दीन भोंगळे, नगरसेवक आरिफ खानापुरे आयुब अब्दुल शेख अमीन कुरेशी, दादा मुल्ला शमशुद्दीन भोंगळे, जहीर खुटेपड, शब्बीर गवंडी, नासिर शेख जावेद शेख इस्माईल मुल्ला वजीर मणियार,खालिद पटेल,मोईन शेख, अल्ताप शेख, सलमान शेख, इशराक शेख, अहेमद शेख, समीर पठाण, शाहरुख गवंडी अमन पठाण, इमरान भोंगळे,सिराज सिद्धकी, शोएब मनियार,एजाज पठाण, साहिल सौदागर, अय्याज सवार इनुस ठाणेदार सह आदी समाज बांधव याप्रसंगी सहभागी झाले होते.
———————————
ईद ए मिलादुन्नबी निमित्त खाऊ व अन्नदान
——————————-
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त जुलूस प्रसंगी लहान चिमुकल्यांना बागवान समाज व कुरेशी समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात खाऊ वाटप करण्यात आले तर ईदगाह मस्जिद परिसरामध्ये या कार्यक्रमाची सांगता प्रसंगी महंमद फकीर यांच्याकडून अन्नदान करण्यात आले.
———————————-
नियोजन बद्ध जुलूस
———————————
या रॅलीचें नियोजन मुस्लिम धर्मगुरु शाह हुसेन कादरी यांच्या नेतृत्वाखाली सदर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कुठल्याही प्रकारचे मोटर सायकलवर रॅली वगैरे काढण्यात आली नव्हती
यावेळी पोलीस निरीक्षक अजित चिंतले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे सह आदी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.