जुन्या रुडी परंपरेला बगल देत राख स्मशानभूमीतील झाडांना टाकली

लोहारा (जि.धाराशिव ) लोहारा तालुक्यातील भातागळी येथील कै. कुसूमबाई रामराव जगताप यांचे अल्पशा आजाराने शनिवारी दुखःद निधन झाले होते. त्यांचा सोमवारी तिसरा दिवस हा राख सावरणे हा कार्यक्रम झाला. जुन्या रुडी परंपरेला बगल देत त्यांची राख पाण्यात टाकून प्रदुषण होण्यापेक्षा ती राख स्मशानभूमीतील झाडांना टाकावे ही इच्छा मयतांच्या मुलांनी फुलचंद जगताप , दत्ता जगताप व मुलगी रेखा सातपुते यांनी व्यक्त केली. त्यानुसार राख स्मशानभूमीतील झाडांना टाकण्यात आली. त्यांच्या पश्चात दोन मुले , मुलगी ,सुना व नातवंडे आहेत.