भव्य घरगुती गणपती व गौरी सजावट स्पर्धेत सहभाग घ्या – अँड. आकांक्षा चौगुले

इक्बाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
भव्य घरगुती गणपती व गौरी सजावट स्पर्धा:2023. ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्था उमरगा यांच्या वतीने भव्य घरगुती गणपती व गौरी सजावट स्पर्धेचे करण्यात आले आहे. तरी उमरगा व लोहारा तालुक्यातील जास्ती जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजिका तथा संस्थेच्या अध्यक्षा अॅड. आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे.
गौरी सजावटसाठी प्रथम पारितोषक 11 हजार रुपये द्वितीय 7 हजार रुपये, तृतीय 5 हजार रुपये, उत्तेजनार्थ 2 हजार रुपये पारितोषक ठेवण्यात आले आहे. व तसेच गणपती घरगुती सजावटसाठी प्रथम प्रथम पारितोषिक 7 हजार रुपये, द्वितीय 5 हजार रुपये, तृतीय 3 हजार रुपये, उत्तेजनार्थ 2 हजार रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे. उमरगा तालुका व लोहारा तालुका स्वतंत्र बक्षिसे देण्यात येतील. सहभागी स्वर्धकांना आकर्षक भेटवस्तु देण्यात येतील.
स्पर्धकांनी आपल्या घरी गणपती व गौरी महालक्ष्मी सजावट केल्यानंतर जास्तीत जास्त 60 सेंकदाचा एक मिनिटाचा व्हिडिओ शुट करुन दि.25 सप्टेंबर पर्यंत संस्थेचे सचिव प्रदिप मदने मो.क्र. 80077 29811 यावती Video पाठविण्यात यावेत, असे आवाहन आयोजिका तथा संस्थेच्या अध्यक्षा अॅड. आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे.