महेंद्र बुध्द विहारात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

लोहारा : लोहारा तालुक्यातील हिप्परगा (सय्यद) येथील महेंद्र बुध्द विहारात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम रविवारी सकाळी ९:०० वाजता घेण्यात आला.
लोहारा तालुक्यातील हिप्परगा सय्यद येथील महेंद्र बुध्द विहार येथे भारतीय संविधान दिनाच्या निमित्त राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रतिष्ठित नागरिक दगडू हिरवे व भानुदास कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तसेच कल्याणी कांबळे, समृद्धी मोरे, श्रद्धा हिरवे, आरोही कांबळे, स्वरांजली कांबळे, यश कांबळे, लखन सुरवसे, समर्थ हिरवे, या विद्यार्थ्यांनी संविधान दिनाबद्दल भाषणे केली.
यावेळी आरपीआय तालुका अध्यक्ष अमित सुरवसे, माजी उपसरपंच करण कांबळे, टीएचओ,बिसिएम गौतम मोरे,महाराष्ट्र पोलिस बाबासाहेब कांबळे, अरविंद सुरवसे, बाळू हिरवे, समर्थ हिरवे, लखन सुरवसे, राजू हिरवे, युवराज सुरवसे, गणेश कांबळे, सदाशिव हिरवे, महिपती मोरे, आकाश कांबळे, चंदाबाई कांबळे, सुनंदा सुरवसे, महादेवी हिरवे, रेश्मा कांबळे, रमा मोरे, निकिता सुरवसे, सह आदी संविधान प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!