लोहारा ते हिप्परगा (रवा) उद्या रविवारी पदयात्रा

लोहारा (जि.धाराशिव ) : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लोहारा तालुका प्रशासनाचे वतीने दिनांक १७/०९/२०२३ रोजी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सकाळी ९.३० वाजता तहसिल कार्यालय लोहारा ते हुतात्मा स्मारक हिप्परगा रवा ता. लोहारा या ठिकाणापर्यंत तालुक्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांनी चालत जाऊन हिप्परगा रवा येथिल हुतात्मा स्मारकास आदरांजली वाहणे बाबत मा. तहसिलदार श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी आवाहन केलेले आहे. तरी तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख यांनी तसेच आपल्या अधिनिस्त सर्व अधिकारी/कर्मचारी यांचेसह तहसिल कार्यालय, लोहारा येथे दिनांक १७/०९/२०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता हजर राहणे बाबत सूचित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!