शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा.डॉ. शेषेराव जावळे पाटील

लोहारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगर संलग्नित भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्था लोहारा, शंकरराव जावळे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या नूतन प्राचार्य पदाचा पदभार प्रा.डॉ. शेषेराव जावळे पाटील यांनी आज दिनांक 11/04/2023 रोजी स्वीकारला.
यावेळी भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नूतन प्राचार्य प्रा. डॉ. शेषेराव जावळे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी संस्थेची आणि महाविद्यालयाच्या पूर्वापार जडण घडण व पूर्ण इतिवृतांत कर्मचाऱ्यांच्या समोर मांडला.खास करून कै. आ. वसंतराव काळे साहेबांची कृतज्ञता व्यक्त करून संस्थेचे सचिव व प्राचार्य या वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा होता हे प्रखरतेने मांडले.
याप्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महविद्यालयाच्या प्राचार्या उर्मिला पाटील उपस्थित होते. प्र. प्राचार्य प्रा.डॉ.विनायक पाटील यांनी मनोगत व्यक्त करून नूतन प्राचार्य यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात अधीक्षक श्री मनोज पाटील यांच्यासह प्रा डॉ सुर्यवंशी आर एम, प्रा डॉ एस एस कदम, प्रा मोटे बी बी, प्रा डॉ सोनवणे, प्रा डॉ कडेकर सी जी, प्रा डॉ माने पी व्ही , प्रा नितिन आष्टेकर व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. एस एस कदम यांनी, तर आभाप्रदर्शन प्रा डॉ गायकवाड पी के यांनी केले.