शिवसेना लोहारा तालुकाप्रमुखपदी अमोल बिराजदार यांची वर्णी ?

लोहारा (जि. उस्मानाबाद): उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या लोहारा तालुकाप्रमुखपदी अमोल बिराजदार यांची वर्णी लागणार असल्याचे संकेत आज रविवारी (ता.१३) उमरगा येथे झालेल्या बैठकीत मिळाले आहेत.

शिवसेना संपर्कप्रमुख अनंत पताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी दुपारी उमरगा-लोहारा तालुक्यातील शिवसैनिकांची बैठक झाली. या बैठकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना बळकट करणे, आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक व सध्या होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसैनिकांची बैठक घेण्यात आली.

शिवसेनेच्या फुटीनंतर प्रथमच उमरगा-लोहारा तालुक्यातील शिवसैनिकांची बैठक घेण्यात आली. शिवसेना वाढविण्यासाठी प्रत्येकाने आपणच नेता व आपणच कार्यकर्ता समजून काम करावे, असे आवाहन संपर्कप्रमुख अनंत पताडे यांनी केले. त्यानंतर रिक्त असलेल्या लोहारा तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी कोणाकडे द्यायची यावर चर्चा झाली. यावर शिवसैनिकांनी अमोल बिराजदार यांची तालुकाप्रमुखपदी निवड करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यामुळे बैठकीतच बिराजदार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून दोन दिवसानंतर याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

या बैठकीस उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, ज्येष्ठ शिवसैनिक अशोक सांगवे, सुरेश वाले, सुधाकर पाटील, लोहारा शहरप्रमुख सलीम शेख, उमरगा युवा सेना तालुकाप्रमुख अजित चौधरी, रणधीर पवार, महेबूब गवंडी, लोहारा पंचायत समितीचे माजी सभापती विलास भंडारे, माजी नगरसेवक श्याम नारायणकर, शेतकरी सेनेचे लोहारा तालुकाप्रमुख शेखर पाटील, बालाजी माशाळकर, पंडित ढोणे, राजू रवळे, अनिल मोरे, नितीन जाधव, प्रेम लांडगे, आकाश जावळे, शुभम जावळे, पिंटू गोरे, चेतन गोरे, सुभाष बबिराजदार, चनबस जेवळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔴 एकनिष्ठतेचं मिळालं फळ !
पक्ष फुटीनंतर तालुक्यात शिवसेना दुभंगली गेली. अनेक शिवसेना पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले. परंतु युवासेना तालुकाप्रमुख पदावर कार्यरत असलेले अमोल बिराजदार शिवसेनेशी एकनिष्ठ राहात कार्यकर्त्यांची मोट बांधून ठेवली. शिवसेना तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी आता त्यांच्याकडे सोपविण्यात येत आहे. अमोल बिराजदार यांना त्यांच्या एकनिष्ठतेच फळ मिळाल्याच्या भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!